नाशिक : महानगरातील सारचे रस्ते अन् गल्लीबोळ निर्मनुष्य.... रस्त्यांवरु न जाणाऱ्या अॅम्ब्युलन्स किंवा तासा- दोन तासांतून जाणा-या एक-दोन दुचाकी वगळता सारे रस्ते अगदी शांतपणे पहुडलेले... चौकांमध्ये केवळ दोन-तीन पोलीस, एखादा कॅमेरामन अन् पत्रकार नजरेस पडतो...दुकानांपैकी केवळ मेडीकल वगळता अन्य प्रत्येक दुकान बंदच... भर बाजारात उभे राहूनदेखील आपल्यालाच आपल्या हृदयाचे ठोके ऐकता येण्यासारखी एक अनोखी ‘जनता संचारबंदी’ रविवारी (दि.२२) नाशकात अनुभवायास येत आहे.
जनता कर्फ्यू : यहां पे सब शांती-शांती हैं... !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 13:01 IST
दशिक्रयेसाठी गंगेवर आलेल्या मयताच्या कुटुंबियांपैकीदेखील मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत विधी आटोपून घरे गाठत संचारबंदीच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
जनता कर्फ्यू : यहां पे सब शांती-शांती हैं... !
ठळक मुद्दे‘जनता कर्फ्यू’ शहरासह जिल्ह्यात १०० टक्के यशस्वी आपल्यालाच आपल्या हृदयाचे ठोके ऐकता येण्यासारखी ‘जनता संचारबंदी’ पहाटेपासूनच फुलणारा फुलबाजार रविवारी फुललाच नाही