जनता कर्फ्यू : यहां पे सब शांती-शांती हैं... !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 12:41 PM2020-03-22T12:41:35+5:302020-03-22T13:01:42+5:30

दशिक्रयेसाठी गंगेवर आलेल्या मयताच्या कुटुंबियांपैकीदेखील मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत विधी आटोपून घरे गाठत संचारबंदीच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

Janata Curfew: There are peace and harmony here ...! | जनता कर्फ्यू : यहां पे सब शांती-शांती हैं... !

जनता कर्फ्यू : यहां पे सब शांती-शांती हैं... !

Next
ठळक मुद्दे‘जनता कर्फ्यू’ शहरासह जिल्ह्यात १०० टक्के यशस्वी आपल्यालाच आपल्या हृदयाचे ठोके ऐकता येण्यासारखी ‘जनता संचारबंदी’ पहाटेपासूनच फुलणारा फुलबाजार रविवारी फुललाच नाही

नाशिक : महानगरातील सारचे रस्ते अन् गल्लीबोळ निर्मनुष्य.... रस्त्यांवरु न जाणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्स किंवा तासा- दोन तासांतून जाणा-या एक-दोन दुचाकी वगळता सारे रस्ते अगदी शांतपणे पहुडलेले... चौकांमध्ये केवळ दोन-तीन पोलीस, एखादा कॅमेरामन अन् पत्रकार नजरेस पडतो...दुकानांपैकी केवळ मेडीकल वगळता अन्य प्रत्येक दुकान बंदच... भर बाजारात उभे राहूनदेखील आपल्यालाच आपल्या हृदयाचे ठोके ऐकता येण्यासारखी एक अनोखी ‘जनता संचारबंदी’ रविवारी (दि.२२) नाशकात अनुभवायास येत आहे.

महानगराच्या प्रत्येक कानाकोपºयात रविवारी सकाळपासून पूर्णपणे बंद पाळण्यात आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांने केलेल्या ‘जनता कर्फ्यू’ शहरासह जिल्ह्यात १०० टक्के यशस्वी होताना दिसत आहे. जनतेच्या सहभागातून संचारबंदी कशाला म्हणतात, ते सामान्य नागरिकांनीच आता दाखवून दिले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने शासनाने केलेल्या संचार बंदीच्या आवाहनाला महानगर आण पिरिसरात अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे महानगरातील नाशिक मध्य,जुने नाशिक, पंचवटी, सातपूर, सिडको, नाशिकरोड या सर्व विभागांतील बहुतांश परिसर सकाळपासून निर्मनुष्य होते. केवळ जुने नाशिक आण िगावठाण परिसरात सकाळच्या दूध खरेदीसाठी सकाळी आठर्पयत झालेली किरकोळ गर्दीवगळता अन्य पूर्ण दिवसभर संपूर्ण महानगर जणू निवांतपणो पहुडलेले होते.
महानगरातील सामान्य नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, रिक्षावाले, हातगाडीवाले, फेरीवाले इतकेच नव्हे तर अगदी हातावर पोट असणा:या मजुरांनीदेखील या जनता संचारबंदीला पुरेपुर प्रतिसाद दिल्याचे चित्न रविवारी दिसून येत होते. तसेच रविवारीच दहावा आल्याने दशिक्रयेसाठी गंगेवर आलेल्या मयताच्या कुटुंबियांपैकीदेखील मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत विधी आटोपून घरे गाठत संचारबंदीच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

Web Title: Janata Curfew: There are peace and harmony here ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.