शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

अंशकालीन निदेशकांचा प्रश्न मार्गी लागणार

By admin | Updated: July 29, 2014 00:54 IST

प्राथमिक शिक्षकसंघाच्या शिष्टमंडळास शिक्षणमंत्री यांचे आश्वासन

पेठ : दोन वर्षांपूर्वी राज्यातील वरिष्ठ प्राथमिक शाळांमध्ये कला, क्रीडा व कार्यानुभव या विषयासाठी नेमणूक केलेल्या अंशकालीन निदेशकांना पुन्हा नियुक्ती देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी प्राथमिक शिक्षकसंघाच्या शिष्टमंडळास दिले़ प्राथमिक शिक्षकसंघाचे राज्य अध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे राजेंद्र दर्डा यांची भेट घेऊन संबंधित विषयी सविस्तर चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेत राज्यातील अंशकालीन निदेशकांना पुन्हा नियुक्ती देण्यासंदर्भात येत्या बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन प्रश्न निकाली काढण्यात येईल, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले.सदरच्या आश्वासनामुळे अंशकालीन निदेशकांना दिलासा मिळणार आहे़ शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व कला, क्रीडा व कार्यानुभव या विषयांकडे होणारे दुर्लक्ष टाळण्यासाठी शासनाने यापूर्वी वरिष्ठ शाळांमध्ये अंशकालिन निदेशकांची नियुक्ती केली होती, मात्र सदरची नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची व शाळा व्यवस्थापन समितीच्या अधिकारात करण्यात आल्याने केवळ वर्षभरात या निदेशकांना कार्यमुक्त करण्यात आले होते़ तेव्हापासून या निदेशकांना पुन्हा सामावून घेण्यासाठी संघाचे प्रयत्न सुरू होते़शिष्टमंडळात राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, राज्य उपनेते वसंतराव हारगडे, दीपिका पुंडे यांच्यासह प्राथमिक शिक्षकसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते़ (वार्ताहर)