शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

सराफ बाजारातील अतिक्रमणांचा मुद्दा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:53 IST

शहर स्मार्ट करतानाचा गावठाणांचा पुनर्विकास करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या महापालिकेकडून अशाप्रकारच्या स्वप्नवत योजना केव्हा राबविल्या जातील हे सांगता येणार नाही, मात्र आहे त्याच समस्या सोडविल्या जात नसल्याचे दिसत होते. दीडशे दोनशे वर्षांपासून जुन्या असलेल्या सराफ बाजारातील अतिक्रमणांची समस्या सोडविली जात नसल्याने येथील व्यवसाय ठप्प होण्याची वेळ आली

नाशिक : शहर स्मार्ट करतानाचा गावठाणांचा पुनर्विकास करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या महापालिकेकडून अशाप्रकारच्या स्वप्नवत योजना केव्हा राबविल्या जातील हे सांगता येणार नाही, मात्र आहे त्याच समस्या सोडविल्या जात नसल्याचे दिसत होते. दीडशे दोनशे वर्षांपासून जुन्या असलेल्या सराफ बाजारातील अतिक्रमणांची समस्या सोडविली जात नसल्याने येथील व्यवसाय ठप्प होण्याची वेळ आली असून, त्यामुळे आता सराफ व्यावसायिक रस्त्यावर उतरण्याची भाषा करू लागले आहेत. हॉकर्स झोन, वाहतुकीचा बृहत आराखडा अशाप्रकारच्या अनेक नियोजन करणाºया महापालिकेला मात्र अंमलबजावणीच करता येत नसल्याने आता सराफ व्यावसायिक आणि परिसरातील नागरिकांचा रोष वाढला आहे. भूतपूर्व नगरपालिका काळापासून सराफ बाजार असून, सराफ असोसिएशन ही संस्थाही तितकीच जुनी आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या बाजारालगतच भांडीबाजार, कापड बाजारदेखील आहे. त्याचप्रमाणे अनेक वर्षांपासून फूलबाजार भरत असून, जंगम व्यावसायिकदेखील आहेत. फूलबाजारातच आता भाजीविक्रेत्यांनी शिरकाव केला आहे, तर नजीकच्या बोहरपट्टीत बोहरीवाणांच्या दुकानांबरोबरच मसाला विक्रेत्यांचीदेखील दुकाने आहेत. शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या आणि तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातील अरुंद गल्लीबोळांची अवस्था बघता महापालिकेने यापूर्वीच सुयोग्य नियोजन करण्याची गरज यापूर्वीच होती. परंतु अद्यापही त्यावर थेट ठोस उपाययोजना केल्या गेल्या आहेत. आज जेव्हा हा विषय ऐरणीवर आला आहे तेव्हा कागदोपत्री असलेल्या आणि अव्यवहार्य योजना कशा अमलात येतील? हा प्रश्न आहे.आज सराफ बाजारात कोणत्याही कामासाठी शिरणे मुश्कील झाले आहे. कोणतेही नियोजन नाही, रस्त्यावरील दुकानांची अतिक्रमणे त्यात रिक्षा आणि मालवाहतूक करणाºया छोट्या मोटारी येथे शिरतात. भरीस भर जुुन्या नाशिकमध्ये राहत असल्याने मूळ नाशिककर असल्याचा हक्क सांगत मारुती कारपासून एक्सयूव्ही यासारख्या गाड्या या गर्दीत घुसवण्याचे प्रकार यामुळे अलीकडे मध्य नाशिकमध्ये जाणे हे दिव्यच आहे. कोणाला जावे लागलेच तर रविवार कारंजा, गोरेराम लेन, मातोश्री मंगल कार्यालय अशा अथवा मेनरोड, शुक्ल गल्ली येथे दुचाकी उभ्या करून नागरिक सराफ बाजारात येतात. आपल्या दुचाकींमुळे अन्य विक्रेत्यांना कोणता त्रास होईल काय हे विचारण्याची तसदीही ते घेत नाहीत. परिणामी आता ऐन सणासुदीत सराफ बाजार पेठ ठप्प होण्याची वेळ आल्याने संबंधितांवर आंदोलनाची वेळ आली आहे.फुलबाजाराचा तिढामहापालिकेच्या वतीने फुलबाजार जुना असला तरी तो स्थलांतरित करण्यासाठी प्रशासनाने मध्यंतरी पुढाकार घेतला होता. मनसेचे अ‍ॅड. यतिन वाघ महापौर असताना यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली होती. गणेशवाडी येथे महापालिकेने भाजीमंडई बांधली असून, ती अद्याप सुरू झालेली नाही. गंगाघाटावरील भाजीविक्रेते तेथे जाण्यास तयार नसल्याने फूलबाजारातील विक्रेत्यांना तेथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव होता. मात्र सराफबाजाराप्रमाणेच फूलबाजारदेखील जुना आहे. शिवाय तो पहाटेच्या वेळीच असतो, असा दावा करीत फूलविक्रेत्यांच्या संघटनांनी त्यास कडाडून विरोध केला. गणेशवाडी येथील भाजीमंडईत सुविधा द्या, मग स्थलांतरित होऊ, असा पवित्रा घेणाºया विक्रेत्यांनी मात्र नकार दिला. त्यामुळे सराफबाजाराचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक