चांदवड तालुक्यात रेडय़ाच्या हल्ल्यात इसम ठार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 17:02 IST2021-08-10T17:02:22+5:302021-08-10T17:02:43+5:30

चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी शिवारातील म्हैसमाळ येथील डोंगरावर रेड्याच्या हल्ल्यात इसम ठार झाला. बारकू विठ्ठल गोधडे असे मृताचे नाव आहे.

Ism killed in Redya attack in Chandwad taluka! | चांदवड तालुक्यात रेडय़ाच्या हल्ल्यात इसम ठार !

चांदवड तालुक्यात रेडय़ाच्या हल्ल्यात इसम ठार !

ठळक मुद्देरेडय़ाच्या मालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल

चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी शिवारातील म्हैसमाळ येथील डोंगरावर रेड्याच्या हल्ल्यात इसम ठार झाला. बारकू विठ्ठल गोधडे असे मृताचे नाव आहे. रेडय़ाने बारकू विठ्ठल गोधडे (४० ) वर्षे यास पोटावर हुदंडून हुदंडून फरफटत नेऊन त्यांच्या पोटातून आतड्या बाहेर येऊन त्यास अति रक्तस्त्रव व गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची फिर्याद पत्नी सिताबाई बारकु गोधडे हिने चांदवड पोलीस स्टेशनला दिली.

रेडय़ाच्या मालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गोधडे याची उत्तर तपासणी करण्यासाठी उपजिल्हा रु ग्णालय येथे आणण्यात आले असता उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत किसान सभेच्या वतीने कॉ.हनुमंत गुंजाळ यांनी या रेड्याच्या मालकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली तर या घटनेची माहिती मिळताच मनमाड उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंग साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस निरीक्षक समीर बारवकर व पोलीस हवालदार बापू चव्हाण हे तपास करीत आहे.

मालकाचा निष्काळजीपणी
म्हैसमाळ येथील डोंगरावर गोधडे पती-पत्नी हे बकऱ्या चारीत असताना राजदेरवाडी येथील नामदेव खंडू जाधव यांच्या मालकीचा काळ्या रंगाचा रेडा हा शिंगाणे मारतो याची जाणीव असूनही त्याकडे दुर्लक्ष व निष्काळजीपणा करून रेड्याला कोणत्याही प्रकारची वेसन,दोरी, लाकडी कढवण न बांधता चरण्यासाठी मोकळे सोडून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 

Web Title: Ism killed in Redya attack in Chandwad taluka!