अपघातांना निमंत्रण : द्वारका चौकातील रस्त्याची झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 17:35 IST2020-08-08T17:33:53+5:302020-08-08T17:35:40+5:30

शहरात अद्याप जोरदार पावसाला सुरुवात झालेली नसून केवल हलक्या सरींचा अधूनमधून वर्षाव होत आहे. तरीदेखील द्वारका चौकातील रस्त्यावर खड्ड्यांची चाळण पहावयास मिळू लागल्याने निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणाचे पितळ उघडे

Invitation to accidents: The road at Dwarka Chowk has been cleared | अपघातांना निमंत्रण : द्वारका चौकातील रस्त्याची झाली चाळण

अपघातांना निमंत्रण : द्वारका चौकातील रस्त्याची झाली चाळण

ठळक मुद्देखड्डे बुजवून नागरिकांना दिलासा द्यावाखड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून अपघात

नाशिक : महामार्गांसह शहरातील १७ रस्ते ज्या चौकात एकत्र येतात तो एकमेव चौक म्हणजे द्वारका. या द्वारका चौकातूनच शहरात प्रवेश करावा लागतो. मागील दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीने द्वारका चौकाची दुरवस्था झाली आहे. या चौकात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, लहान-मोठ्या अपघातांची मालिका सुरू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरात अद्याप जोरदार पावसाला सुरुवात झालेली नसून केवल हलक्या सरींचा अधूनमधून वर्षाव होत आहे. तरीदेखील द्वारका चौकातील रस्त्यावर खड्ड्यांची चाळण पहावयास मिळू लागल्याने निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणाचे पितळ उघडे झाले आहे. द्वारका चौकातून उड्डाणपूल जातो. यामुळे निम्मा चौक झाकला जातो, तरीदेखील पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. द्वारक ा चौकातील रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून अपघात होत आहेत. तसेच पावसाच्या पाण्याने रस्त्यावरील डांबरीकरण नाहीसे होऊन कच, खडी सर्वत्र विखुरली गेली आहे. यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खड्डे चुकवितांना वाहनचालकांना तारेवरची कसरत करत द्वारका ओलांडावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने चांगल्या पद्धतीने द्वारका चौकात पडलेले खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
---

Web Title: Invitation to accidents: The road at Dwarka Chowk has been cleared