एमएससीआयीटी परीक्षेत तांत्रिक कारणांमुळे व्यत्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 18:26 IST2019-04-03T18:25:04+5:302019-04-03T18:26:38+5:30
नाशिक : जिल्ह्यातील काही एमएससीआयीटी परीक्षेत तांत्रिक कारणांमुळे व्यत्यय आलाचा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांनी या प्रकाराविषयी नाराजी व्यक्त केली असून परीक्षेदरम्यान आलेल्या व्यत्ययाचे छायाचित्र सोशल मिडियातून वायरल केले आहे. नाशिक जिल्ह्यातून एकूण २ हजार ६७ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या माध्यमातून बुधवारी (दि.३) घेण्यात आलेली एमएससीआयटी संगणक प्रशिक्षण वर्गाची परीक्षा दिली. महाराष्ट्र सरकारसाठी एमकेसीएलतर्फे विकसित करण्यात आलेल्या या संगणक प्रशिक्षण वर्गाचे शासकीय नोकरीत महत्वाचे स्थान असून खासगी क्षेत्रातही ही परीक्षा उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याने जिल्हाभरातून ११८ परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आली. संगणक चालविण्याचे प्रशिक्षण उपलब्ध करून देणाºया प्रशिक्षणाचा एमएस सीआयटी या अभ्यासक्रमात समावेश असल्याने राज्यभरातून दहावी व बारावीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या प्रशिक्षण वर्गाला प्रवेश घेतात.

एमएससीआयीटी परीक्षेत तांत्रिक कारणांमुळे व्यत्यय
नाशिक : जिल्ह्यातील काही एमएससीआयीटी परीक्षेत तांत्रिक कारणांमुळे व्यत्यय आलाचा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांनी या प्रकाराविषयी नाराजी व्यक्त केली असून परीक्षेदरम्यान आलेल्या व्यत्ययाचे छायाचित्र सोशल मिडियातून वायरल केले आहे.
नाशिक जिल्ह्यातून एकूण २ हजार ६७ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या माध्यमातून बुधवारी (दि.३) घेण्यात आलेली एमएससीआयटी संगणक प्रशिक्षण वर्गाची परीक्षा दिली. महाराष्ट्र सरकारसाठी एमकेसीएलतर्फे विकसित करण्यात आलेल्या या संगणक प्रशिक्षण वर्गाचे शासकीय नोकरीत महत्वाचे स्थान असून खासगी क्षेत्रातही ही परीक्षा उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याने जिल्हाभरातून ११८ परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आली. संगणक चालविण्याचे प्रशिक्षण उपलब्ध करून देणाºया प्रशिक्षणाचा एमएस सीआयटी या अभ्यासक्रमात समावेश असल्याने राज्यभरातून दहावी व बारावीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या प्रशिक्षण वर्गाला प्रवेश घेतात. या विद्यार्थ्यांची परीक्षा बुधवारी घेण्यात आली. नाशिकमधील सुमारे २ हजार ६७ विद्यार्थ्यांनी ही जिल्हाभरातील ११८ परीक्षा केंद्रांवर दिली. यात नाशिक शहरातील १ हजार ९२ तर ग्रामीण भागातील १ हजार ७२ विद्यार्थ्यांचा समावेश असून नाशिक शहरात ६१ व ग्रामीण भागात ५७ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. यात शहरातील काही परीक्षा केंद्रांवर तांत्रिक कारणामुळे व्यत्यय आल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली असून काही परीक्षा केंद्रावर किरकोळ तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा उशीरा सुरू झाल्याची घटना घडली. परंतु एमकेसीएलचे नाशिक विभाग प्रमुख सुभाष पाटील यांनी परीक्षेत कोणतीही तांत्रिक समस्या उद्भवली नसल्याचे स्पष्ट केले असून काही ठिकाणी स्थानिक अपरिहार्यतेमुळे परीक्षा उशीरा सुरू झाल्याचे सांगितले.