भांडणामध्ये हाताला चाकू लागून दुखापत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 01:51 IST2022-05-06T01:50:47+5:302022-05-06T01:51:06+5:30

सुभाषरोड येथे धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादात हाताला सुरी लागून एक युवक जखमी झाला.

Injury to the hand in a fight | भांडणामध्ये हाताला चाकू लागून दुखापत

भांडणामध्ये हाताला चाकू लागून दुखापत

नाशिकरोड : सुभाषरोड येथे धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादात हाताला सुरी लागून एक युवक जखमी झाला. सुभाषरोडला राहणारा सुमित श्याम भोसले व त्याचा मित्र आदित्य राजेश निकाळे यांचा रोहन सुभाष जाधवला रेल्वे स्थानकाबाहेर धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला. रोहन जाधव आदित्यला मारण्यासाठी हातात सुरी घेऊन आला. सुमित भोसले रोहनला अडविण्यास गेला. रोहनच्या हातातील सुरी सुमितला लागून तो जखमी झाला. रोहनने शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Injury to the hand in a fight