अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 01:34 IST2019-11-18T01:33:41+5:302019-11-18T01:34:45+5:30
सिन्नर-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातातील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विशाल रामनाथ थोरात (२८, रा. पंचाळे) असे मृत तरुणाचे नाव आहे.

अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू
सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातातील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विशाल रामनाथ थोरात (२८, रा. पंचाळे) असे मृत तरुणाचे नाव आहे.
विशाल हा मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील कामाला होता. स्प्लेंडर दुचाकीने तो घराकडे परतत असताना कारने त्याला जोरदार धडक दिली. यात त्याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यास नाशिक येथी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान विशालचा मृत्यू झाला.