इनोव्हाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 00:48 IST2018-07-31T00:48:01+5:302018-07-31T00:48:47+5:30
भरधाव इनोव्हाने दुचाकीला दिलेल्या धडकेत चौदा वर्षीय मुलगा ठार झाल्याची घटना शनिवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास मुंबई नाक्यावरील क्युरी मानवता कॅन्सर हॉस्पिटलच्या नवीन इमारतीसमोर घडली़ फैजान अन्वर शेख (वय १४, रा. भद्रकाली) असे अपघातात मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव असून, त्याच्या पाठीमागे बसलेला अरफत खान (१५, रा़ रहेमानी कॉलनी, औरंगाबाद) हा गंभीर जखमी झाला आहे़

इनोव्हाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
नाशिक : भरधाव इनोव्हाने दुचाकीला दिलेल्या धडकेत चौदा वर्षीय मुलगा ठार झाल्याची घटना शनिवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास मुंबई नाक्यावरील क्युरी मानवता कॅन्सर हॉस्पिटलच्या नवीन इमारतीसमोर घडली़ फैजान अन्वर शेख (वय १४, रा. भद्रकाली) असे अपघातात मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव असून, त्याच्या पाठीमागे बसलेला अरफत खान (१५, रा़ रहेमानी कॉलनी, औरंगाबाद) हा गंभीर जखमी झाला आहे़ फैजान शेख व अरफत खान हे दोघे दुचाकीवरून (एमएच २०, सीएल ७७९६) मुंबई नाक्याकडून द्वारका सर्कलकडे जात होते. यावेळी द्वारका सर्कलकडून आलेल्या भरधाव इनोव्हा कारने (एमएच १५, जीए ९२) (पूर्ण नंबर माहीत नाही) दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये फैजान शेख याच्या डोक्यास व गुप्त भागास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेला अरफत खान हा गंभीर जखमी झाला.