अंदरसूलला मन्याड नदीत गाळमुक्त अभियानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 15:57 IST2019-03-07T15:57:33+5:302019-03-07T15:57:54+5:30
शासन योजना : युवा मित्रकडून मशिनरी उपलब्ध

अंदरसूलला मन्याड नदीत गाळमुक्त अभियानास प्रारंभ
अंदरसूल : टाटा ट्रस्ट ,युवा मित्र व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने जलसमृद्धी प्रकल्पांतर्गत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेस अंदरसुल येथे जहागीरदार वस्ती लगत बंधारा व मन्याड नदी पात्रात प्रारंभ करण्यात आला.
या योजनेअंतर्गत इंधनाचा खर्च महाराष्ट्र शासनाच्या गाळ मुक्त धरण या योजनेतून केला जाणार असून युवा मित्र संस्थेने मशिनरी उपलब्ध करून दिली आहे. या कामाचे स्वरूप युवा मित्रच्या अधिकारी दीपाली वाघ यांनी सांगितले. त्यातून अंदरसूल ग्रामपंचायतने आवश्यक ते ठराव करून सर्व बंधारे गाळमुक्त व्हावे यासाठी पाठपुरावा करण्यात आला. या प्रक्रियेत प्रकल्प व्यवस्थापक अजित भोर, प्रकल्प समन्वयक मंगेश बोपचे, प्रकल्प अभियंता धनंजय देशमुख, येवला तालुका समन्वयक दीपाली वाघ, आकाश चीने आदी सहभागी होते.
या प्रसंगी जलसंधारण अधिकारी शेळके तसेच येवला कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मकरंद सोनवणे,अंदरसुलच्या सरपंच सौ विनिता सोनवणे, ग्राम पंचायत सदस्य योगेश जहागीरदार, शिवसेना नेते दत्तू सोनवणे, दत्तात्रेय सोनवणे, आणासाहेब ढोले, धनंजय जहागीरदार, प्रकाश बजाज, जनार्दन जानराव, सुभाष सोनवणे आदींसह जेष्ठ नागरिक उपस्थित होते. भविष्यात पाणी साठवण वाढून त्याचा मोठा फायदा शिवारला होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.