मेअखेरपर्यंत माहिती पुस्तिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 01:15 IST2019-05-20T01:14:01+5:302019-05-20T01:15:46+5:30

आर्थिक मागास प्रवर्गाचे १० टक्के आरक्षण आणि मराठा समाजाला मिळालेले १६ आरक्षणा यामुळे आरक्षण तक्ता तयार करण्याचे काम लांबल्याने अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेचे कामही रखडले होते. परंतु आता हा संभ्रम दूर झाला असून, माहिती पुस्तिकेच्या छपाईचे काम सुरू झाल्याने मे महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा प्रथम भाग भरण्यासाठी माहिती पुस्तिकांचे वाटप होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

Information booklet from Maybach | मेअखेरपर्यंत माहिती पुस्तिका

मेअखेरपर्यंत माहिती पुस्तिका

ठळक मुद्देअकरावी प्रवेशप्रक्रिया : टंकलेखन पूर्ण, मुद्रितशोधनाचे काम सुरू

नाशिक : आर्थिक मागास प्रवर्गाचे १० टक्के आरक्षण आणि मराठा समाजाला मिळालेले १६ आरक्षणा यामुळे आरक्षण तक्ता तयार करण्याचे काम लांबल्याने अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेचे कामही रखडले होते. परंतु आता हा संभ्रम दूर झाला असून, माहिती पुस्तिकेच्या छपाईचे काम सुरू झाल्याने मे महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा प्रथम भाग भरण्यासाठी माहिती पुस्तिकांचे वाटप होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
नाशिक महापालिका परिसरात गेल्या वर्षी विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी २० एप्रिलपासून आॅनलाइन प्रक्रियेस सुरुवात झाली होती, तर १० मेपासून विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिकांचे वितरण सुरू झाले होते. यंदा मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू होऊनही आॅनलाइन प्रक्रियेस अद्याप सुरुवात झालेली नसल्याने दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट विद्यार्थी आणि पालकांना अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेची प्रतीक्षा लागली आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात ९ मे रोजी रावसाहेब थोरात सभागृहात मुख्याध्यापकांची कार्यशाळा पार पडली असली तरी अद्याप माहिती पुस्तिकेची प्रत्यक्ष छपाई सुरू झालेली नाही. आतापर्यंत केवळ टंकलेखन झाले असून, मुद्रितशोधनाची प्रक्रिया सुरू आहे. मुद्रितशोधन पूर्ण झाल्यावर तत्काळ सर्व पुस्तिकांची छपाई सुरू होणार असून, मे महिन्यांच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तिका पडतील, असा विश्वास नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने व्यक्त केला आहे.
विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी
गेल्यावर्षी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरून घेण्यात आला होता. शहरातील विविध शाळांना ४ मे रोजीच माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले होते, तर १० मेपासूून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिकांची विक्री सुरू झाली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी निकालापूर्वी प्रक्रियेतील पहिला टप्पा पूर्ण करून निकालानंतर दुसरा भाग भरला होता. असे असतानाही अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुमारे १२ आॅक्टोबरपर्यंत सुरू होती. त्यामुळे अगदी शेवटच्या टप्प्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम सत्र परीक्षेसाठी तयारी करता आली नाही. त्या पार्श्वभूमीवर यंदा प्रवेशप्रक्रिया लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा असताना अद्यापही प्रवेशप्रक्रियेचे निश्चित वेळापत्रक जाहीर झाले नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी उमटत आहे.

Web Title: Information booklet from Maybach