शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बागलाणमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 00:43 IST

सटाणा : बागलाणच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात बर्ड फ्लूने एकाच शेतकऱ्याच्या तीनशे कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेत बुधवारी ...

ठळक मुद्देकिलिंग ऑपरेशन : ११९२ कोंबड्यांची विल्हेवाट

सटाणा : बागलाणच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात बर्ड फ्लूने एकाच शेतकऱ्याच्या तीनशे कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेत बुधवारी (दि.२७) या परिसरात पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शीघ्र कृती दलाने किलिंग ऑपरेशन राबवले.यामध्ये वगरीपाडा व बारीपाडा या दोघा गावांमधील ११९२ कोंबड्या पथकाने शास्त्रोक्त पद्धतीने पकडून प्रशासनाने केलेल्या खड्ड्यात पुरण्यात आल्या. या ऑपरेशनदरम्यान आमदार दिलीप बोरसे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान बुधवारी जिल्ह्याचे पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. सुधाकर शिरसाठ, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बाबूराव नरवाडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गरजे यांच्यासह सहायक आयुक्त डॉ. गिरीश पाटील, डॉ. विजय पाटील, डॉ. बाळासाहेब होन, डॉ. धनराज चौधरी, डॉ. प्रदीप झोड, डॉ. मिलिंद भणगे यांनी शीघ्र कृती दलाच्या टीमचे नेतृत्व करीत संपूर्ण किलिंग प्रक्रिया पूर्ण केली व या रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव थांबण्यासाठी विविध मार्गदर्शक सूचना या भागातील आदिवासी जनतेला करण्यात आल्या. दरम्यान, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी आदिवासी जनतेच्या झालेल्या नुकसानीची दखल घेत प्रशासनाला सर्व नुकसानभरपाई देण्याची सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना केली आहे.इन्फोगावाचे निर्जंतुकीकरणप्रशासनाला किलिंग ऑपरेशनदरम्यान पक्षी पुरण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने पंचायत समितीचे माजी सदस्य सोमनाथ सूर्यवंशी यांनी आपल्या खासगी जागेत जागा उपलब्ध करून देत प्रशासनाला सहकार्य केले. ग्रामपंचायत प्रशासन किलिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यात असल्याची माहिती सरपंच लक्ष्मण महाले, ग्रामसेवक योगेश भामरे यांनी दिली आहे. 

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूHealthआरोग्य