सागाच्या झाडांवर अळीचा प्रादूर्भाव; पर्यावरण संस्थेतर्फे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 05:30 PM2020-06-26T17:30:08+5:302020-06-26T17:30:38+5:30

कळवण : तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून एका अज्ञात काळ्या अळीने जंगलातील सागाच्या झाडाच्या पानास आपले भक्ष्य बनविले आहे. त्यामुळे परिसरातील किमती सागाच्या झाडाची वाढ खुंटून त्याचे अस्तित्व नष्ट होते की काय अशी भीती शेतकऱ्यात व्यक्त होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र निसर्ग आणि पर्यावरण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किशोर कुवर यांनी कळवणच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Infestation of larvae on saga trees; Statement by Environmental Organization | सागाच्या झाडांवर अळीचा प्रादूर्भाव; पर्यावरण संस्थेतर्फे निवेदन

सागाच्या झाडांवर अळीचा प्रादूर्भाव; पर्यावरण संस्थेतर्फे निवेदन

Next

कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात जिरवाडे, जामले, दरेगाव,कोसुरडे,भाकुरडे, करंमभेळ, कुंमसाडी आदी भागातील वनविभागाच्या कार्यक्षेत्रात येणाºया डोंगरावर विविध प्रकारची जंगली झाडे आहेत आणि जून महिन्याच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे परिसरात व डोंगरांवर सर्वत्र हिरवळ दिसत असते. सागाची झाडे आपल्या मोठमोठ्या पानांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. मात्र अज्ञात अळीच्या प्रादुर्भावामुळे पश्चिम पट्ट्यातील सागाच्या पानांना काळ्या रंगाच्या अळीने खाल्यामुळे ठिकठिकाणी पांढरे भुरकट पट्टे निर्माण झाले असून पाने नष्ट होत आहेत. त्यामुळे वेळीच या अज्ञात अळींवर उपाययोजना न केल्यास शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. यासाठी वनविभागाने तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी डॉ. कुवर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Infestation of larvae on saga trees; Statement by Environmental Organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.