इंदोरे ग्रामस्थ दारूबंदीसाठी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 01:38 PM2020-12-24T13:38:05+5:302020-12-24T13:38:22+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील इंदोरे परिसरातील कोलेनवाडी, वासाळी फाट्याजवळील सोनारझुरी येथे अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे, गावठी दारु व ताडीचे बेकायदेशीर धंदे सर्रासपणे सुरू असून याबाबत इंदोरे येथे झालेल्या ग्रामसभेत दारूबंदीसाठी ग्रामस्थांच्या उपस्थितीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.

Indore villagers aggressive for alcohol ban | इंदोरे ग्रामस्थ दारूबंदीसाठी आक्रमक

इंदोरे ग्रामस्थ दारूबंदीसाठी आक्रमक

Next

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील इंदोरे परिसरातील कोलेनवाडी, वासाळी फाट्याजवळील सोनारझुरी येथे अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे, गावठी दारु व ताडीचे बेकायदेशीर धंदे सर्रासपणे सुरू असून याबाबत इंदोरे येथे झालेल्या ग्रामसभेत दारूबंदीसाठी ग्रामस्थांच्या उपस्थितीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी संबंधित दारु व ताडी विक्री करणाऱ्या व्यक्तीस अनेकवेळा समज देवून देखील धंदे बंद न केल्यामुळे बेकायदेशीर दारू व ताडी विक्री करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात यावे याबाबतचे निवेदन इंदोरे येथील सरपंच जनार्दन शेणे यांच्या नेतृत्वाखाली घोटीचे पोलिस निरीक्षक संजय कवडे यांना देण्यात आले आहे.
इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या इंदोरे परिसरातील वासाळी फाट्याजवळील सोनारझुरी तसेच कोलेनवाडी येथील बेकायदेशीर सुरू असलेल्या दारु व ताडीच्या धंद्यामुळे परिसरातील पुरूष मंडळीहे दारु पिऊन परिसरात तसेच गावांमध्ये अश्लील शिवीगाळ करत असतात. यामुळे गावात नेहमीच वादविवाद होत असतात. त्यामुळे गावात व परिसरात दारूबंदी करण्यात यावी यासाठी सरपंच जनार्दन शेणे व नागरिकांनी घोटी येथील पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय कवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सरपंच जनार्दन शेणे यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत दारुबंदी व ताडी बंदीबाबत एकमताने ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर याबाबतचे निवेदन घोटी पोलिस ठाण्यात देण्यात आले . यावेळी कवडे यांनी बेकायदेशीर दारू व ताडी धंदे विक्री करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात येऊन धंदे लवकरात लवकर बंद करण्यात येतील असे आश्वासन दिले. निवेदन देतांना नथु पिचड, माजी सरपंच देवराम खतेले, माजी सरपंच जगन पावडे, नारायण खतेले, कुमार खतेले, सुनील खतेले, कान्हू जाधव, भोरू भागले, उमाकांत खाडे, अंकुश खतेले, तानाजी धादवड, विठ्ठल खतेले, अमृता खतेले, अमृता बेंडकोळी, बाळु खतेले, गंगाराम खतेले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Indore villagers aggressive for alcohol ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक