इंदिरानगरला पादचारी महिलेचे मंगळसूत्र खेचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 18:45 IST2018-12-17T18:45:09+5:302018-12-17T18:45:49+5:30
नाशिक : दुचाकीवरील संशयितांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील सोडतीन तोळ्याचे मंगळसूत्र खेचून नेल्यची घटना रविवारी (दि़१६) सायंकाळच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरातील आनंदनगर परिसरात घडली़

इंदिरानगरला पादचारी महिलेचे मंगळसूत्र खेचले
नाशिक : दुचाकीवरील संशयितांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील सोडतीन तोळ्याचे मंगळसूत्र खेचून नेल्यची घटना रविवारी (दि़१६) सायंकाळच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरातील आनंदनगर परिसरात घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वंदना दिगंबर पठाडे (४८, फ्लॅट क्रमांक-७, साई सहवास अपार्टमेंट,आनंदनगर) या सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास पाथर्डी फाट्याकडून आनंदनगरकडे जात होत्या़ आई आश्रमाजवळील स्वीट दुकानासमोरून जात असताना समोरून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांपैकी पाठीमागील इसमाने पठाडे यांना जोराचा धक्का देऊन त्यांच्या गळ्यातील ८७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले़
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़