शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

भारतातील युवकांनी सकारात्मक होण्याची गरज; युवा राजदूत अभिजीत दिघावकर याचे मत

By धनंजय रिसोडकर | Published: August 10, 2019 10:45 PM

नाशिक- जगभरातील युवकांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे जगाचे लक्ष वेधले जावे, सक्रीयपणे समाजासाठी योगदान देण्याची उर्जा निर्माण व्हावी. तसेच युवकांना योग्य मार्ग आणि दिशा देऊन सर्वांगीण विकास साधला जावा, या उद्देशाने १२ आॅगस्टला आंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. सोमवारी (दि. १२) असलेल्या आंतरराष्टÑीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर आंतराष्टÑीय युवा परिषदेतील भारताचा युवा राजदूत अभिजीत दिघावकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आजच्या युवकांकडे सकारात्मक उर्जा आहे. त्यामुळे युवकांनी सकारात्मक बनले पाहीजे असे मत लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देयुवा पिढीला सक्षम करण्याची गरजयुवकांना सर्वच क्षेत्रात समान संधीची आवश्यकता

नाशिक- जगभरातील युवकांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे जगाचे लक्ष वेधले जावे, सक्रीयपणे समाजासाठी योगदान देण्याची उर्जा निर्माण व्हावी. तसेच युवकांना योग्य मार्ग आणि दिशा देऊन सर्वांगीण विकास साधला जावा, या उद्देशाने १२ आॅगस्टला आंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. सोमवारी (दि. १२) असलेल्या आंतरराष्टÑीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर आंतराष्टÑीय युवा परिषदेतील भारताचा युवा राजदूत अभिजीत दिघावकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आजच्या युवकांकडे सकारात्मक उर्जा आहे. त्यामुळे युवकांनी सकारात्मक बनले पाहीजे असे मत लोकमतशी बोलताना व्यक्त केले.प्रश्न : आंतरराष्टÑीय युवा दिनाच्या महत्व काय?दिघावकर : १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (युनो) आमसभेत एक ठराव पारित होऊन १२ आॅगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून पाळण्यात येण्याचे ठरले आणि त्यानंतर २००० सालापासून दरवर्षी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. सर्वांना समान संधी उपलब्ध करून देऊन युवा पिढीला सक्षम करणे, शांत आणि समृद्ध समाज निर्माण करणे, त्या माध्यमातून सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधणे हेच या आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या आयोजनाचे ध्येय आहे.प्रश्न : देशाला विकसित राष्टÑ करण्यासाठी भारतीय युवकांना कोणत्या प्रकारच्या संधी मिळायला हव्या असे तुम्हाला वाटते ?दिघावकर : भारताच्या लोकसंख्येपैकी सुमारे ६० टक्के लोकसंख्या ३५ वर्षांच्या आतील आहे. युवकांची हीच प्रचंड संख्या भारतासारख्या विकसनशील देशाला विकिसत राष्ट्रांच्या पंक्तीत नेऊन बसविण्यासाठी महत्वाची ठरणार आहे. राष्ट्रांचा विकास हा तरु णाईचा कल्पकतेने, कुशलतेने आणि सकारात्मकपणे वापर करूनच आजपर्यंत झालेला आहे. परंतु भारताला या मनुष्यबळाचा फायदा करून घेण्यासाठी युवकांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, तसेच आर्थिक, सामाजिक, आणि राजकीय क्षेत्रामध्ये समान संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.प्रश्न : तुम्ही युवकांसाठी कोणत्या प्रकारचे सामाजिक उपक्रम करता ?दिघावकर : आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्र, अतिदुर्गम भागातील पाड्यांवर जाऊन शिक्षणाबाबत प्रबोधन, स्वच्छतेबाबत जनजागृती, पर्यावरण संवर्धनात त्यांचा सहभाग वाढवणे, मुलींची लग्न अठराव्या वर्षानंतरच करण्यामागील कारणांचा प्रसार, पुरुष-महिला समानता, जनसंख्या नियंत्रणात राखण्याबाबत प्रबोधन तसेच युवावर्गासाठी आणि गोरगरीब शेतकरी व महिलांसाठी उपयुक्त असलेल्या शासकीय योजनांची माहिती देणे,ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये जाऊन युवक-युवतींशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण अशा प्रकारे आमच्या जाणीव या संस्थेच्या माध्यमातून कार्य केले जात असून त्याला युवा वर्गाकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतो.प्रश्न : भारतातील युवा पिढी विषयी काय मत आहे?दिघावकर: वाढत्या युवा संख्येमुळे विविध समस्यांनाही भारताला तोंड द्यावे लागणार आहे. बेरोजगारी आणि त्यामुळे गुन्हेगारी वृत्तीकडे कल वाढणे, सोशल मीडियाचा अतिवापर, युवकांमधील वाढतं नैराश्य आणि असंतोष, यांसारख्या विविध समस्यांना वेळीच पायबंद घालत युवापिढीला सकारात्मक बनण्याची गरज आहे.मुलाखत: धनंजय रिसोडकर

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिकInternationalआंतरराष्ट्रीय