शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

परदेशात लाज काढणाऱ्या भारतीय पर्यटकांची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 05:58 IST

सार्वजनिक वर्तन-बदलण्याची गरज : पैशांच्या बळावर बेपर्वाईने वागणाºया उर्मट भारतीयांबद्दल नाराजी

अपर्णा वेलणकरनाशिक : ‘चेक आऊट’ करून निघालेल्या भारतीय पर्यटकांचे वाहन रिसॉर्टच्या आवारात अडवले आहे... रिसॉर्टचे अधिकारी त्या वाहनातले सामान बाहेर काढून भरलेल्या बैगा विस्कटून झडती घेत आहेत... कपड्यांच्या गुंडाळ्यांमध्ये दडवलेल्या वस्तूमागून वस्तू बाहेर पडतात. साबण, शाम्पू, टॉवेल्स, चादरी, हेअर ड्रायर इत्यादी... हे सगळे रिसॉर्टमधून का चोरले? असा जाब रिसॉर्टचे अधिकारी विचारत आहेत. पोलिसांना बोलावण्याचे फर्मान निघते आहे. आणि हा सगळा तमाशा पाहात उभे असलेले भारतीय पर्यटक कुटुंब अजिबात कसनुसे वैगेरे झालेले नाही. ‘ही फैमिली टूर आहे, पोलिसांना बोलावू नका. आम्ही या वस्तूंचे पैसे भरतो’, असे जणू धमकावत एक मध्यमवयीन स्त्री सगळे प्रकरण फटाफट निपटू पाहाते आहे. तिच्याने काही होत नाही हे पाहून या कुटुंबातला पुरुष पुढे होतो आणि रिसॉर्टच्या अधिकाऱ्यांना ‘बाजूला घेऊन’ खास भारतीय पद्धतीने तोडपाणी करू पाहातो पण ते अधिकारी बधत नाहीत. हातात सोन्याचे कडे मिरवणारा तो पुरुष ‘वी विल पे...वी विल पे’ चा हेका धरतो तेव्हा त्या बेमुर्वतखोरीने वैतागलेलेअधिकारी चिडून म्हणतात, ‘वी नो यू हॅव लॉट ऑफ मनी!’

सध्या सोशल मीडियावर व्हायरल असलेली ही क्लिप एव्हाना बहुतेकांनी पाहिलेली असेल. ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होऊ पाहणाºया बाहुबली भारताला लाज आणणारा हा प्रसंग बालीमधल्या एका महागड्या रिसॉर्टमध्ये घडला आहे. हा मेसेजही क्लीपसोबत फिरतो आहे. जगभरच्या पर्यटन उद्योगात भारतीय पर्यटकांची प्रतिमा किती वेगाने घसरते आहे, याचा उत्तम आरसा म्हणजे ही क्लिप. स्वित्झर्लण्डमधल्या गस्ताद येथील ‘आर्क एन सिएल’ नावाच्या हॉटेलने ‘डिअर गेस्टस फ्रॉम इंडिया’ अशा शीर्षकाने लावलेली एक ‘व्हायरल’ नोटीस सध्या मोठ्या चर्चेचा विषय असून अशा पध्दतीने भारतीयांना टोमणे मारणे हा छुपा वंशवाद असल्याची टीकाही होते आहे. पण हे टीकाकारही ‘आपण भारतीय’ पर्यटक म्हणून कमालीचे उद्ध्ट आणि बेपर्वा असल्याचे मात्र मान्य करतात.जागतिकीकरणानंतर भारतील ामध्यमवर्ग ‘अपवर्डली मोबाईल’ झाला. त्याच्या खिशात पैसे खुळखुळू लागले. ‘पर्यटक’ बनून प्रथम थायलंड-पटाया-बँकॉक असा परवडणारा जगप्रवास सुरू केलेल्या भारतीयांची झेप आता युरोप अमेरिकेसह समस्त जग पादाक्रांत करीत आहे. खिशातला पैसा, त्या बळावर आपण वाट्टेल ते विकत घेऊ शकतो असा उद्दाम आत्मविश्वास यामुळे प्रवास म्हणजे निव्वळ धुडगुस घालून एन्जॉय करणे असे वाटणारे भारतीय पर्यटक सध्या जगभर ‘धुमाकूळ’ घालत असल्याचे दिसते. अर्थात याला अपवाद आहेतच.विमानात घुसायला रेटारेटी करणे, मुलाबाळांना सर्वत्र बागडू देणे, मोठमोठ्याने हसणे-बोलणे, स्थानिक परंपरा-शिस्त-नियमांचा अजिबात आदर न करणे, सर्वत्र बिनदिक्कत कचरा करणे, फुकट ते पौष्टीक या न्यायाने हॉटेलातल्या वस्तू आणि अन्न चोरणे हे नेहमीचेच! किंबहुना या सवयींमुळेच अनेक रिसॉर्ट आणि हॉटेलांना खास भारतीय पाहुण्यांसाठी ‘वेगळी सूचनापत्रे’ लिहावी लागत आहेत.जे ‘व्हायरल’ आहे ते खरे असेल अगर नसेलही; पण आपण भारतीय सार्वजनिक वावर-वागण्याच्या जागतिक संस्कृतीमध्ये आजही ‘अडाणी’ आहोत, हे मान्य करायला हवे. आणि हो, सुधारायला हवे!झडतीदरम्यान भारतीय प्रवाशांच्या बँगांमधून साबण, शाम्पू, चादरी, हँगर्स आदी वस्तू आढळून आल्या. त्यावेळी भारतीय पर्यटक आम्ही याचे पैसे भरायला तयार आहोत, असे सांगत होते. तसेच हात जोडून खास पद्धतीने तोडपाणीही करू पाहताना दिसत आहेत.आपल्याला हे नक्कीच पाळता येईलविमानतळ, विमानाचा अंतर्भाग, बसेस-रेल्वे, हॉटेल्स-रिसॉर्टच्या लॉबीज ही गोंधळ घालण्याची, मोठ्याने बडबडण्याची, मुला-बाळांना बागडू देण्याची ठिकाणे नव्हेत.विमान प्रवासात अतिरिक्त मद्यासाठी हट्ट धरणे, केबीन क्रूशी हुज्जत घालणे, स्वच्छतागृह घाण करणे, वचावचा खाणे, केबीनक्रूने परवानगी देण्याआधी आपापले मोबाईल सुरू करणे टाळावे.हॉटेलच्या खोलीत इंडक्शन शेगडीवर खिचडी टाकणे, टी-मेकरमध्ये नूडल्स शिजवणे, इस्त्रीवर पापड भाजणे हे प्रकार टाळावेत. नाईट गाऊन्स घालून खोलीबाहेर पडू नये.परदेशात जिथे राहणार त्या हॉटेल/रिसॉर्टच्या खोलीतल्या वस्तू तुमच्या वापरासाठी असतात, ‘घेऊन जाण्यासाठी’ नव्हे हे लक्षात ठेवावे. ब्रेकफास्ट ‘फ्री’ असतो, तो भरपेट खाण्यासाठी. तेथील अन्नपदार्थ, फळे, ड्रायफू्रटस्, साखरेच्या छोट्या पुड्या उचलून पिशवीत भरणे अत्यंत अनुचित आहे.ऐतिहासिक वास्तू, संग्रहालये इथे आपल्या बोलण्यावर ताबा ठेवावा.‘रांग’ ही सभ्य जगातली एक शिस्त आहे. ती काटेकोर पाळावी. देशाबाहेर आपण आपल्या देशाचे ‘प्रतिनिधी’ असतो, हे लक्षात ठेऊन सभ्यतेने वागावे-वावरावे. आणि महत्वाचे, हे सगळे आपल्या देशात असतानासुध्दा करावेच.

 

टॅग्स :Nashikनाशिकtourismपर्यटनPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी