शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

भारतीय हज यात्रेकरुंनी मक्केत फडकविला तिरंगा

By azhar.sheikh | Published: August 18, 2018 4:45 PM

भारतीय हजयात्रींनी  तिरंग्याचे ध्वजारोहण करून मानवंदना देत एकमेकांना ‘जश्न-ए-यौम-ए-आजादी’ मुबारक अशा शब्दांत शुभेच्छा दिल्याची माहिती हज समितीचे जिल्हा समन्वयक जहीर शेख यांनी दिली.

ठळक मुद्दे राज्यभरातून सुमारे १५ हजार यात्रेकरू हजला रवाना प्रती यात्रेकरूला सुमारे १२ हजारांचा फटका यावर्षी हजयात्रा महागली जरी असली तरी उत्साह कायम जिल्ह्यातून सुमारे एक हजार दोनशे यात्रेकरू हजयात्रेसाठी

अझहर शेख, नाशिक : भारतातून सौदी अरेबियामधील मक्का शहरात सर्व हज यात्रेकरुन सुखरुप पोहचले आहे. भारताचा स्वातंत्र्यदिन सर्व भारतीय हजयात्रेकरंनी एकत्र येत उत्साहात मक्कामध्ये साजरा केला.बुधवारी (दि.१५) सकाळी भारतीय हजयात्रींनी  तिरंग्याचे ध्वजारोहण करून मानवंदना देत एकमेकांना ‘जश्न-ए-यौम-ए-आजादी’ मुबारक अशा शब्दांत शुभेच्छा दिल्याची माहिती हज समितीचे जिल्हा समन्वयक जहीर शेख यांनी दिली.‘मिना’ परिसरात सर्व यात्रेकरु मुक्कामी आहे. या ठिकाणी जगभरातून आलेल्या यात्रेकुरंना एकसारखे निवास तंबु सौदी सरकारकडून उभारण्यात आलेले आहेत. यामुळे कोण यात्रेक रु कुठले आहेत, याची ओळख पटविण्यासाठी तंबूंच्या परिसरात असलेले राष्ट्रध्वजांची महत्त्वाची भूमिका असते. ‘मिना’ भागात भारतीय हज यात्रेकरुं च्या तंबूंच्या परिसरात फडकणाऱ्या तिरंगा ध्वजाला सर्व भारतीयांनी एकत्र येत मानवंदना दिली.जिल्ह्यातून सुमारे एक हजार दोनशे यात्रेकरू हजयात्रेसाठी रवाना झाले आहेत. रविवारी (दि.१२) अखेरच्या तीन विमानांनी मुंबईमधून सौदीच्या जेद्दाह विमानतळाच्या दिशेने उड्डाण केले. राज्यभरातून सुमारे १५ हजार यात्रेकरू हजला रवाना झाले आहेत. यावर्षी प्रती यात्रेकरूला सुमारे १२ हजारांचा फटका एकूण खर्चामध्ये बसला आहे.दरवर्षी इस्लामी कालगणनेच्या ‘जिलहिज्जा’ या उर्दू महिन्यात धनिक मुस्लीम बांधव हजयात्रेसाठी रवाना होतात. इस्लामच्या पाच मुलस्तंभांपैकी एक स्तंभ ‘हज’ असल्याचे धर्मगुरू सांगतात. ‘ईद-उल-अज्हा’ अर्थात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा दरवर्षी पार पडते. देशभरातून मोठ्या संख्येने यात्रेकरू हजयात्रेला रवाना झाले आहेत. यावर्षी हजयात्रा महागली जरी असली तरी उत्साह कायम असल्याचे दिसते.जिल्ह्यातील मालेगावसह सर्व तालुके मिळून बाराशे यात्रेकरू हज समितीच्या माध्यमातून हजयात्रेला गेले आहेत, तर तीनशेपेक्षा अधिक यात्रेकरून खासगी हज टूरमार्फत गेल्याचे समजते. यावर्षी भारत सरकारची ‘जीएसटी’ आणि सौदी सरकारचा ‘वॅट’ यामुळे यात्रेच्या एकूण खर्चात प्रती यात्रेकरूला अंदाजे बारा हजार रुपये अधिक मोजावे लागल्याची माहिती जिल्हा हज समिती समन्वयक जहीर शेख यांनी ‘लोकमत’शी बोलाताना दिली. एक हज यात्रेकरूला यावर्षी सुमारे दोन ते अडीच लाखांपर्यंतचा खर्च यात्रेसाठी आला. सबसीडी केंद्र सरकारने रद्द केल्यामुळे हजयात्रेकरूला विमान खर्चात मिळणाºया सवलतीपासूनही वंचित रहावे, लागल्याची खंत शेख यांनी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, हज समितीच्या मुंबई मुख्य कार्यालयाशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्याबाबत उदासीनता दर्शविली.

टॅग्स :Haj yatraहज यात्राNashikनाशिकIndependence Dayस्वातंत्र्य दिवस