शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मविप्र नाशिकमध्ये साकारणार भारतीय शैक्षणिक वारसा संग्रहालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 16:56 IST

गेल्या शतकपासून अविरत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या मराठा विद्या शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे नाशिकमध्ये भारतीय शैक्षणिक वारसा संग्रहालय उभारण्यात येत आहे. छत्रपती शाहू महाराजांनी १९२० मध्ये पायाभरणी केलेल्या उदोजी मराठा बोर्डिंगमध्ये १९१७ पासून संग्रहालयाच्या पायाभूत उभारणीचे काम सुरू असून या माध्यमातून नाशिकसह संपूर्ण राज्य आणि भारतातील शिक्षण, संस्कृती आणि शिक्षणाच्या विकासाशी  संबंधित साहित्याचे प्रदर्शन, संरक्षण, जतन व संशोधन येथे करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देउदोजी मराठा बोर्डिंगमध्ये शैक्षणिक वारसा संग्रालयाची उभारणी शिक्षण, संस्कृती आणि शिक्षण साहित्याचे होणार संरक्षण, जतननाशिकसह राज्य आणि भारतातील शैक्षणिक प्रवास उलगडणार

नाशिक : गेल्या शतकपासून अविरत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या मराठा विद्या शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे नाशिकमध्ये भारतीय शैक्षणिक वारसा संग्रहालय उभारण्यात येत आहे. छत्रपती शाहू महाराजांनी १९२० मध्ये पायाभरणी केलेल्या उदोजी मराठा बोर्डिंगमध्ये १९१७ पासून संग्रहालयाच्या पायाभूत उभारणीचे काम सुरू असून  या माध्यमातून नाशिकसह संपूर्ण राज्य आणि भारतातील शिक्षण, संस्कृती आणि शिक्षणाच्या विकासाशी संबंधित साहित्याचे प्रदर्शन, संरक्षण, जतन व संशोधन येथे करण्यात येणार असल्याची माहिती मविप्रच्या सचचिटणीस निलिमा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. संग्रहालयाचे एकूण तीन विभाग असून पहिल्या विभागात जगाचा, दुसऱ्या विभागात देशाचा शैक्षणिक इतिहास मांडण्यात येणार आहे. तर तिसºया विभागात संस्थेचा चित्ररुपी इतिहास रेखाटण्यात येईल. संग्रहालयाविषयी माहिती देताना निलीमा पवार म्हणाल्या, जगभरात एकूण आठ शैक्षणिक संग्रहालये आहेत. त्यापैकी वारसा (संस्कृती)  आणि समकालीन महत्त्व यांचे प्रतिनिधीत्व करणारी केवळ दोनच संग्रहालये आहेत. मविप्रेने स्थापन केलेले हे तिसरे संग्रहालय ठरणार आहे. विसाव्या शतकाच्या सुरवातीला म्हणजे १९२० मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी  पायाभरणी केलेल्या गंगापूर रोडवरील उदोजी मराठा बोर्डींग येथे मागील तीन वर्षांपासून संग्रहालय उभारणीचे काम सुरू असून या संग्रहालयाद्वारे भारतीय शिक्षण प्रशिक्षण विकास, स्थानिक व ग्रामीण  शाळांचा उदय व इतिहास, भारतीय शालेय इतिहासाची उक्रांती आणि शाळा प्रायोजक शैक्षणिक वारसा संपत्ती आदी विषयांवर वैशिष्यपूर्ण प्रदर्शने भरविण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, संग्राहलय मार्गदर्शक भुजंगराव बोबडे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, उपसभापती  राघोनाना अहिरे, संचालक नानासाहेब महाले, सचिन पिंगळे, आर्किटेक्ट धनंजय शिंदे, डॉ. डी.डीय काजळे, डॉ. एन. एस.  पाटील, रमेश पडवळ उपस्थित होते. 

ऐतिहासिक दस्त, वस्तू दान करण्याचे आवाहन भारतीय शैक्षणिक वारसा संग्रहालयात काही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कलाकृतींचे संकलनही केले जाणार आहे. यात शैक्षणिक व  हस्तलिखित साधने, पुस्तके, पारितोषिके, प्रमाणपत्रे, ऐतिहासिक दस्तऐवज, छायाचित्रे आणि इतर दुर्मिळ बाबींचा समावेश करण्यात येणार आहे. आतापर्यंत जवळपास ७३ लाख ईबूक, २ लाख पीएचडीचे प्रबंध, २८लाख हस्तलिखितांची पानांच्या डिजिटल डाटा उपलब्ध झाला आहे. हा संग्रह आणखी समृद्ध करण्यासाठी ऐतिहासिक मुल्य व सांस्कृतिक महत्व असलेल्या कलाकृतींचे दान संग्रहालयास करण्याचे आवाहन सरचिटणीस निलिमा निलीमा पवार यांनी यावेळी केले. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकmarathaमराठा