शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

भारत जगाला अहिंसेचे मूल्य शिकविणारे राष्ट्र

By admin | Updated: October 25, 2016 01:17 IST

डेव्हीड ब्लंडेल : शांतता परिषदेचे प्रथम सत्र

नाशिक : जागतिक स्तरावर कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली असून, भारत हे जगाला अहिंसेचे मूल्य शिकविणारे राष्ट्र असल्याचे प्रतिपादन चीनच्या तैवान चेंगची विद्यापीठाचे प्रा. डेव्हीड ब्लंडेल यांनी केले. एमएमआरके महिला महाविद्यालयात १९व्या जागतिक शांतता शिक्षण परिषदेच्या प्रथम सत्रात ‘शांततेचा मार्ग, सहिष्णुता आणि मूल्याधिष्ठित जीवन’ विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, डॉ. प्रियरंजन त्रिवेदी, प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, डॉ. अनिल काकोडकर, संस्थेचे सचिव डॉ. एम. एस. गोसावी आदि उपस्थित होते. ब्लंडेल म्हणाले, संपूर्ण जगाने पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचे चटके सोसले असल्याने सर्वांनी मिळून शांततेच्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे असून, भारत हे शांततेचे उत्तम उदाहरण आहे. येथे विविध धर्माचे लोक सामाजिक एकात्मता आणि सर्वधर्मसमभाव एकत्र असून, सहिष्णु वातावरणामुळेच या खंडप्राय देशात कायम शातंता टिकून आहे. भारतात प्रजासत्ताक अस्तित्वात आल्यानंतर शिक्षणाचा प्रचार, प्रसार व विकास झपाट्याने होत असल्याने येथील समाजात मोठा बदल झाला असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगासमोर बुद्धांचे विचार मांडून जगाला शांततेचा संदेश दिला असल्याचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. दरम्यान, डॉ. अनिल काकोडकर यांनी शिक्षण पद्धतीत बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञान आधारित बदल घडवून कुशल विद्यार्थ्यांसह कुशल मार्गदर्शन आणि प्रशिक्षकांची निर्मिती करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने ग्रामीण आणि शहरी भागातील विषमतेची दरी मिटविण्याचे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले, तर डॉ. प्रिय रंजन त्रिवेदी म्हणाले, शांततेचे मूल्य प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. त्यासाठी ‘टीच वन, इच वन’ हे सूत्र आत्मसात करावे, जगासमोर अशांतता ही समस्या असली तरी त्याचे उत्तर दुसरी समस्या बेरोजगारीच्या रूपाने आहे. ही समस्या दूर करण्यासाठी शिक्षणाचा प्रचार-प्रसार आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. अरुण निगवेकर यांनी शिक्षकांनी आपली भूमिका बदलत्या काळानुसार बदलली असल्याचे लक्षात घेऊन संशोधनात्मक शिक्षणप्रणाली आत्मसात करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी केले. (प्रतिनिधी)महात्मा गांधी यांच्या विचारांची गरजजागतिक शांतता परिषदेच्या पहिल्या दिवसाच्या द्वितीय सत्रात शांतता, सहिष्णुता आणि मूल्याधिष्ठित जीवन या विषयावरील तैवानच्या शांतता कार्यकर्त्या हुई जी वांग, सीमा बाधुरी व प्रकाश पाठक यांनी ज्ञानाचे परावर्तन शहाणपणात होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. साधना जोशी व डॉ. विजय गोसावी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. एस. आर. खंडेलवाल यांनी केले, तर तृतीय सत्रात ‘अहिंसेसाठी शांतता शिक्षण’ या विषयावर अ‍ॅड. डेव्हीड जोसेफ यांनी अहिंसेचा प्रचार प्रसार करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या विचारांचे अनुकरण करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. कविता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, प्रा. वृंदा भार्गवे यांच्या मार्गदर्शनात ‘उमंग’ हा सांस्कृतिक कार्यक्र मातून शांततेचा संदेश देण्यात आला.