शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

अपक्ष उमेदवारांमुळे वाढली ‘डोकेदुखी’!

By admin | Updated: November 12, 2016 22:40 IST

अपक्ष उमेदवारांमुळे वाढली ‘डोकेदुखी’!

गिरीश जोशी  मनमाडमनमाड पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, प्रत्येक प्रभागातून मोठ्या संख्येने निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरू पाहात आहेत. उपद्रव मूल्य ठरणाऱ्या अपक्ष उमेदवारांची मनधरणी करून त्यांनी या ना त्या प्रकारे आपल्या उमेदवारास पाठिंबा द्यावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात मनमाड येथे सर्वाधिक १६२ उमेदवार रिंगणात असून, यामध्ये ५८ उमेदवार अपक्ष निवडणूक लढवित आहेत.विविध उद्दिष्ट्य डोळ्यांसमोर ठेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या हौशा, नवशा गवशा उमेदवारांमुळे राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. यात पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या उमेदवारांचाही समावेश आहे. परंतु हे बंडखोर त्या त्या पक्षासाठी अडचणीचे ठरत आहेत. माघारीच्या दिवशी ५९ अपक्षांनी माघार घेतली असली तरी तब्बल ५८ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये काही अपवादात्मक प्रबळ असे अपक्ष उमेदवार आहेत. ते सोडता काही उमेदवारांचे उद्दिष्ट वेगळे असल्याचे बोलले जात आहे. उमेदवारी माघार घेताना काही अपक्ष उमेदवारांनी मी या प्रभागातून उमेदवारी केली होती मात्र मी माघार घेऊन अमुक उमेदवाराला पाठिंबा देत असल्याची भूमिका घेतली आहे. येत्या २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीसाठी वातावरण तापू लागले असून, महायुती व आघाडी न झाल्याने शिवसेना, भाजपा, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर होणाचे चित्र आहे. त्यामुळे बसपा व एमआयएमआयएम या पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुकीत चांगलेच रंग भरले आहेत.निवडणुकीसाठी १६२ उमेदवार रिंगणात असून, यात तब्बल ५८ अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. अपक्षांची मोठी संख्या पक्षाच्या उमेदवारांना डोकेदुखी ठरू पाहात आहे. निवडणुकीच्या रिंगणात महिलासुद्धा मागे नसून, एकूण ८४ महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक १४ अ व १४ ब मध्ये सर्वाधिक प्रत्येकी १० उमेदवार रिंगणात आहेत. या दोन्ही प्रभागात अपक्षांची संख्या अधिक आहे. दोन्ही प्रभागात प्रत्येकी ६ अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अपक्ष उमेदवारांमध्ये काही प्रबळ उमेदवार असले तरी प्रभागपद्धतीच्या निवडणुकीमुळे त्यांना अडचण निर्माण झाली आहे. मोठ्या संख्येने दाखल झालेल्या अपक्ष अर्जामुळे बंडखोरीचा वनवा सर्वच पक्षांना लागला असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाने उमेदवारी नाकारलेले नाराज तसेच अपक्ष उमेदवारांनी ‘आता नाही तर कधीच नाही’ अशा अविर्भावात निवडणुकीच्या आखाड्यात अपक्ष म्हणून उडी घेतली आहे. पराभव झाला तरी हरकत नाही पण आता माघार नाही या इर्षेने अनेक उमेदवार पेटून उठले आहेत. या उपद्रव मूल्य ठरलेल्या उमेदवारांची मनधरणी करून त्यांनी पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.