शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
4
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
5
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
6
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
7
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
8
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
9
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
10
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
11
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
12
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
13
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
14
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
15
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?
16
परदेशी माध्यमांचा मोदींवर एवढा राग का ?
17
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
18
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
19
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
20
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 

साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी चोरट्या वृक्षतोडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 2:56 PM

मुंजवाड : बागलाण तालूक्याच्या पश्चिम भागात महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर दिमाखात उभा असलेल्या तसेच अवघ्या महाराष्ट्रातील पर्यटक व गिर्यारोहकांचे आकर्षण असलेल्या साल्हेर किल्यावरील वनसंपदेची मोठ्या प्रमाणात चोरटी वृक्षतोड होत असल्याने किल्ला परिसर दिवसेंदिवस उजाड होत आहे. या वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने निसर्गप्रेमी नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे.

वनविभागाचे दुर्लक्ष : निसर्गप्रेमी नागरिकात संतापमुंजवाड : बागलाण तालूक्याच्या पश्चिम भागात महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर दिमाखात उभा असलेल्या तसेच अवघ्या महाराष्ट्रातील पर्यटक व गिर्यारोहकांचे आकर्षण असलेल्या साल्हेर किल्यावरील वनसंपदेची मोठ्या प्रमाणात चोरटी वृक्षतोड होत असल्याने किल्ला परिसर दिवसेंदिवस उजाड होत आहे. या वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने निसर्गप्रेमी नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे.साल्हेर किल्याच्या पायथ्याशी वन विभागाचे कार्यालय असून या ठिकाणी पर्यटकांसाठी विश्रामगृहात निसर्ग परिचय केंद्रही उभारले आहे. तरीदेखील या परिसरातील वनराई चोरटया मार्गाने नामशेष करण्याचा प्रयत्न होत असतांना वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळे पर्यटकांमध्ये तसेच निसर्गप्रेमीमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.साल्हेर किल्याच्या परिसराचा विकास व्हावा तसेच पर्यटकांची वर्दळ वाढून या परिसरातील नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प केला आहे. तत्पूर्वीच या परिसरातील जंगलाची छुपी वृक्षतोड होत असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. किल्याच्या पायथ्याशी भवानी मातेचे पुरातन मंदिर असून या परिसरात त्या काळी असलेल्या वसाहतीचे अवशेष भग्न अवस्थेत त्याची साक्ष देत शेवटच्या घटका मोजत आहेत. जून्या वसाहतीच्या घरांमध्ये आज मोठमोठी आंबा, चिंच, जांभूळ, सादडा तसेच करवंदीच्या जाळी वाढल्या आहेत. या जाळींमध्ये घरांचे अवशेष, पाण्याची विहीर, दळणाचे जाते नजरेस पडतात. या परिसरातील आंबे दिल्लीच्या बादशाहास खास नजराना म्हणून पाठवला जात असे. आजही किल्लाच्या पायथ्याशी अवाढव्य अशी आम्रवृक्षाची झाडे पहावयास मिळतात. या आंब्यांना खास गोडी आहे. परंतू चोरट्या वृक्षतोडीमुळे या भागातील वनसंपदा वन विभागाच्या अनास्थेमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. दोन राज्यांच्या सीमेवर असलेला हा दुर्गम भाग आहे. संपूर्ण आदीवासी परिसर असून स्वयंपाकासाठी लाकडी सरपणाचा उपयोग मोठया प्रमाणात होत असल्यामुळेही वृक्षतोड नेहमीचीच झाली आहे. सरपणासाठी केली जाणारी वृक्षतोड थांबावी यासाठी या भागातील रहिवाशांना शासनाकडून मोफत गॅस वाटप करण्यात आले. त्याचा वापर होतो की नाही याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. वनविभागाने वेळीच लक्ष देऊन ही वनसंपदा वाचवावी, अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.कोट...ऐतिहासीक साल्हेर, मुल्हेर किल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पुरातन वृक्ष असून या वृक्षांची अशीच लुट सुरु राहिल्यास हा परिसर बोडका होण्यास वेळ लागणार नाही. हा वारसा जपण्याची स्थानिक रहिवाशांसह वन विभागाचीही जबाबदारी आहे. वन विभागाने याची तात्काळ दखल घेऊन वृक्षतोड थांबवावी.- राहुल पाटील, नगरसेवक, सटाणाकोट...साल्हेर किल्याच्या पायथ्याशी होणाऱ्या वृक्षतोडीचा प्रकार संतापजनक असून ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यावर आळा घालण्यात येईल. येथील पन्नास एकरात भव्य शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प आमदारांनी केला आहे. शिवसृष्टी निर्माण झाल्यानंतर वृक्षतोडीलाही आळा बसेल.- बिंदूशेठ शर्मा, जिल्हाध्यक्ष, भाजप किसान सेल, सटाणा

टॅग्स :Nashikनाशिक