शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत भर; चिंता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 00:10 IST

नाशिक : जिल्ह्यात आज सिन्नर व इगतपुरी तालुक्यात प्रत्येकी दोन, तर येवल्यातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, इगतपुरी तालुक्यात ४८ जणांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले असून, बेलगाव येथील कुटुंबाने मुंबईहून आलेल्या व्यक्तीची माहिती दडविल्याप्रकरणी एका कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : जिल्ह्यात आज सिन्नर व इगतपुरी तालुक्यात प्रत्येकी दोन, तर येवल्यातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, इगतपुरी तालुक्यात ४८ जणांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले असून, बेलगाव येथील कुटुंबाने मुंबईहून आलेल्या व्यक्तीची माहिती दडविल्याप्रकरणी एका कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिन्नर : तालुक्यातील दापूर व देशवंडी येथे मुंबई येथून आलेल्या दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. काही दिवसांपूर्वी आपल्या गावाला ते मुंबई येथून आले होते. या दोन जणांमुळे सिन्नर तालुक्यातील कोरोनाबाधितरु ग्णसंख्या १४ झाली आहे .दापूर येथे ४० वर्षीय युवक १७ तारखेला मुंबईतून आला होता. त्याला त्रास झाल्याने शनिवारी सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर देशवंडी येथील २० वर्षीय युवती मुंबई येथून कुटुंबासह देशवंडी येथे आली होती. तिचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तहसीलदार राहुल कोताडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांच्यासह आरोग्य प्रशासनाने दोन्ही गावांना भेट देत दापूर व देशवंडी परिसरातील भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत या भागात १४ दिवस सर्वेक्षण केले जाणार आहे. दापुर व देशवंडी येथील रु गांच्या संपर्कातील कुटुंबातील प्रत्येकी ९ व्यक्तींना सिन्नरच्या ग्रामीण रु ग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. बच्छाव यांनी दिली. तर उर्वरित लो कॉन्टॅक्टमधील व्यक्तींना होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. दापूर येथे एक, तर देशवंडी येथे तीन आरोग्य पथक सर्व्हे करणार आहेत.नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील घोटी व बेलगाव कुºहे येथे सोमवारी (दि.२५) दोन कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर घोटी येथील बाजारपेठ मेडिकल व दवाखाने वगळता आठ दिवस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दोन दिवसांपूर्वी घोटी येथे कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आला होता. त्यापाठोपाठ सोमवारी बेलगाव कुºहे येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. विशेष म्हणजे सदर रुग्णावर भायखळा येथील रेल्वेच्या दवाखान्यात हृदयरोगावर डायलिसिस पद्धतीने उपचार सुरू होते. मात्र सध्या कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर तेथील उपचारपद्धतीमुळे रुग्णाच्या नातेवाइकांनी पुढील उपचारासाठी रुग्ण नाशिकला हलवले. रविवारी सायंकाळी रुग्णास बेलगाव कुºहे येथे आणण्यात आले. १४ मे रोजी रुग्णाची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्याचे रिपोर्ट सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यानंतर येथील वैद्यकीय अधिकारी जी. पी. बांबळे हे आरोग्य पथक घेऊन कोरोनाबाधित रु ग्णाच्या घरी दाखल झाले. सदर बेलगाव येथील कुटुंबाने मुंबईहून आलेल्या व्यक्तीची माहिती लपविली असून, रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने वाडीवºहे पोलीस ठाण्यात रुग्णाच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.----------------------------येवल्यात एक पॉझिटिव्ह; सात अहवाल प्रलंबितयेवला : तालुक्यातील कानडी येथील २४ वर्षीय तरूणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसºया दिवशी शहरातील एका ७० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. येवल्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोन झाली असून, प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणा सक्रि य झाली आहे. येवल्यातील सात जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. कानडी येथील कोरोनाबाधित २४ वर्षीय तरूणाशी संपर्कात आलेल्या सात जणांचे स्वॅब तपासणीसाठी नाशिकला पाठविण्यात आले आहेत. या सातही जणांना बाभूळगाव येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, नाशिकच्या अहवालातून २४ वर्षीय महिला व २९ वर्षीय पुरूष बाधित असल्याचे सांगितले गेले असले तरी सदर रूग्ण हे नाशकात असून त्यांनी मुखेडचा पत्ता दिल्याने येवल्यात रूग्णसंख्या वाढल्याचे दिसते. मुखेडच्या संबंधित बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींनाही खबरदारी म्हणून गावपातळीवर होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. कानडी येथेही खबरदारीचा उपाय म्हणून गावात जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली.

 

टॅग्स :Nashikनाशिक