शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ

By admin | Updated: August 26, 2016 22:33 IST

महापालिकेचा सिडको विभाग उदासीन : कॉँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन

 सिडको : गेल्या काही दिवसांपासून सिडको तसेच परिसरात डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ झाली असून, महापालिका याबाबत उदासीन असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. डेंग्यूच्या फैलावाबाबत उपाययोजना करावी, यासाठी सिडको विभागीय कॉँग्रेस पक्षाच्या वतीने मनपाच्या विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.सिडको विभागात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी मनपाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सिडको परिसर हा दाट लोकसंख्या असलेला भाग असून याठिकाणी थंडी, हिवताप यांसारखे हजारो रुग्ण असतानाच गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूसदृश रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. डेंग्यूच्या फैलावावर तातडीने उपाययोजना करावी, याबाबत सिडको विभाग कॉँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. ब्लॉक अध्यक्ष मीरा साबळे, नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांच्या नेत्ृात्वाखाली मनपा सिडको विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांना निवेदन दिले. निवेदनात डासांच्या फैलावाबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच वेळोवेळी औषध व धूर फवारणी करावी. गेल्या अनेक महिन्यांपासून फॉगिंगची कामे बंद असून, तीदेखील सुरू करावी. प्रभागामध्ये घंटागाडी अनियमित येत असल्याने यात सुधारणा करून घंटागाडी नियमित करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी माणिक जायभावे, डॉ. प्रशांत आंबरे, सुभाष पाटील, सूरज चव्हाण, संतू पाटील, बाळू साळवे, मनीषा जमदाडे, निंबा जाधव, मनोज बोडके, गोकूळ जायभावे, माधव पुजारी, अशोक जायभावे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)