शहरं
Join us  
Trending Stories
1
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
2
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
3
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
4
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
5
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
6
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
7
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
8
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
9
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
10
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
11
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
12
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
14
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
15
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
16
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
17
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
18
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
19
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

साडेसहा लाख रुपये असलेली बॅग पळवून नेल्याची घटना

By admin | Updated: December 29, 2014 01:32 IST

साडेसहा लाख रुपये असलेली बॅग पळवून नेल्याची घटना

पंचवटी : मुंबईहून भाजीपाला विक्रीचे पैसे घेऊन घराकडे परतणाऱ्या व्यापाऱ्यावर हल्ला करून डोळ्यात मिरची पूड फेकून दोघा भामट्यांनी साडेसहा लाख रुपये असलेली बॅग पळवून नेल्याची घटना पेठरोडवरील मोतीसुपर मार्केटजवळ घडली आहे. भरवस्तीत रात्री साडेदहा वाजता घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. लुटारूंनी केलेल्या हल्ल्यात व्यापारी विनोद अग्रहरी हा जखमी झाला असून, त्याला दिंडोरीरोडवरील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, मोतीसुपर मार्केट इमारतीत राहणारे विनोद सदाशिव अग्रहरी यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असून, ते मुंबईला भाजीपाला माल पाठवितात. काल ते भय्याराम यादव व रामप्रसाद अग्रहरी यांच्यासमवेत मुंबई-दादर येथे भाजीपाला मालाचे पैसे घेण्यासाठी गेले होते. रात्री ते पेठफाटा येथे बसने उतरले आणि तिघेही जण घराकडे (मोतीसुपर मार्केट)कडे पायी निघाले मोतीसुपर मार्केटजवळ येताच पाठीमागून आलेल्या दोघांनी विनोद अग्रहरी यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली व त्यानंतर कशाने तरी डोक्यावर प्रहार केला व अग्रहरी खाली पडताच त्यांच्या हातात रोकड असलेली बॅग हिसकावून पळवून नेली. यावेळी अग्रहरी यांच्यासमवेत असलेल्या दोघांनी जीव वाचविण्यासाठी इमारतीत पळ काढला व चोर चोर म्हणून आरडाओरड केली. त्यानंतर इमारतीत जागे झालेले रहिवासी खाली उतरले, मात्र तोपावेतो लुटारूंनी बॅग घेऊन पलायन केले होते. लुटारू हे रात्रीपासूनच पाळत ठेवून होते रोकड लुटल्यानंतर संशयितांनी भक्तिधामकडे पलायन करून तेथून दुचाकी घेऊन ते पसार झाले. या घटनेनंतर अग्रहरी यांना जखमी अवस्थेत दिंडोरीरोडवरील संजीवनी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याबाबत रात्री उशिरा पोलीस ठाण्यात दोन लाख रुपयांची रोकड चोरी गेल्याबाबतचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (वार्ताहर)