अंगणगाव येथे विद्यार्थी वाचन कट्ट्याचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 18:28 IST2019-09-24T18:27:35+5:302019-09-24T18:28:01+5:30
विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून एक नावीन्यपूर्ण असा वाचनाचा कट्टा हा उपक्र म अंगणगाव शाळेत येथे सुरू करण्यात आला.

अंगणगाव जिल्हा परिषद शाळेत वाचन कट्ट्याचे उद्घाटन करताना सरपंच विठ्ठलराव आठशेरे व शिक्षक वर्ग.
जळगाव नेऊर : विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून एक नावीन्यपूर्ण असा वाचनाचा कट्टा हा उपक्र म अंगणगाव शाळेत येथे सुरू करण्यात आला.
या वाचन कट्ट्याचे उद्घाटन सरपंच विठ्ठलराव आठशेरे यांनी केले, तर प्रमुख पाहुणे म्हणून अंगणगाव केंद्रप्रमुख रमेश
खैरनार होते. तसेच दप्तरमुक्त शनिवार या उपक्र मांतर्गत मागील दप्तरमुक्त शनिवारी सुंदर
हस्ताक्षर स्पर्धा हा उपक्र म राबविला होता.
त्या उपक्र मातील बक्षिसांचे वाटपदेखील करण्यात आले. यामध्ये तिसरीतील अनिता राजाराम निसार प्रथम क्र मांक, अश्विनी दादासाहेब वाकळे, द्वितीय चौथीमध्ये प्रेरणा रवींद्र गायकवाड प्रथम क्र मांक, अनुष्का दीपक चावरे द्वितीय क्र मांक, पाचवीमध्ये वैष्णवी साठे प्रथम क्र मांक, केतन नवनाथ ठोंबरे द्वितीय क्र मांक, सहावीत श्रावणी धर्मा जाधव प्रथम क्र मांक, भाग्यश्री साईनाथ त्रिभुवन द्वितीय क्र मांक, सातवीत वसुंधरा शरद अहिरे प्रथम क्र मांक व सोहनी गंगाराम सोनवणे द्वितीय क्र मांक अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली. या कार्यक्र मासाठी उपक्र मशील शिक्षक गोकुळ वाघ, रंजना कापडणीस, महेश वारभोग व पूनम दुकळे यांनी मार्गदर्शन केले.