शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

पक्षिमहोत्सवाचे उद्घाटन : तीन दिवस विविध कार्यक्रम; वनविभागाकडून छाायचित्र प्रदर्शन; पर्यटकांची गर्दी नांदूरमधमेश्वर येथे भरला पक्ष्यांचा मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:54 AM

सायखेडा : महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखले जाणारे पक्षी अभयारण्यात यंदा प्रथमच पक्षिप्रेमींसाठी पर्वणी ठरणारा तीन दिवसांचा ‘बर्ड फेस्ट’ अर्थातच पक्षिमहोत्सवाची सुरुवात झाली.

ठळक मुद्दे उद्घाटन आमदार अनिल कदम यांच्या हस्ते विविध प्रकारच्या माशांच्या जाती

सायखेडा : महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखले जाणारे पक्षी अभयारण्यात यंदा प्रथमच पक्षिप्रेमींसाठी पर्वणी ठरणारा तीन दिवसांचा ‘बर्ड फेस्ट’ अर्थातच पक्षिमहोत्सवाची सुरुवात झाली असून, तीन दिवस चालणाºया सोहळ्याचे उद्घाटन आमदार अनिल कदम यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मुख्य वनसंरक्षक एन.के. प्रवीण, सुनील लिमये, एस. व्ही रामाराव, उपवनसंरक्षक रामानुजन, सामाजिक वनीकरणाचे सूर्यवंशी, वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, नांदूरमधमेश्वर अभयारण्याचे अधिकारी भगवान ढाकरे, चापडगावचे सरपंच सुवर्णा दराडे, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, नंदू सांगळे, गणपत हाडपे, संदीप टर्ले, पंडित सोनवणे, सुनील सोनवणे, दत्तू मुरकुटे, सुभाष सोनवणे, नितीन मोगल आदींसह पक्षिप्रेमी उपस्थित होते. यावेळी आमदार अनिल कदम म्हणाले की, १९८६ मध्ये हा भाग अभयारण्य म्हणून अधिसूचित केला असून, नाशिक वन्यजीव विभागाकडून क्षेत्र व्यवस्थापन करण्यात येते. धरण क्षेत्रात अनेक पक्ष्यांची गर्दी असते, तर विविध प्रकारच्या माशांच्या जातीही येथे पहायला मिळतात. पक्षी निरीक्षणाचा छंद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविणे विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी ही मेजवानी असल्याने तीन दिवस या महोत्सवाचे आयोजन केल्याने पर्वणी ठरली आहे.महाराष्ट्राचे भरतपूर संबोधल्या जाणाºया नांदुरमधमेश्वर पक्षी अभयारण्य वन्यजीव विभागाच्या वतीने पहिल्यांदाच तीन दिवसीय पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात पक्षितज्ज्ञांची व्याख्याने होणार असून, रंगीबेरंगी पक्षी निरीक्षणची संधी पर्यटकांना प्राप्त होणार आहे. पक्ष्यावरील पुस्तके व छायाचित्र प्रदर्शन या निमित्ताने भरविण्यात आले आहे. परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांना पक्ष्याविषयी मार्गदर्शन केले जात आहे तसेच शनिवार व रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनेक शाळा या दिवसात भेट देतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.या पक्ष्यांचा मुक्कामअभयारण्यात टिल्स, गडवाल, शॉवलर, क्रे न, पिनटेल आदी स्थलांतरित पक्षी, तसेच पाणकावळे, पाणडुबी, रोहित, चमचा, धनवर, मोर शराटी, मोठा रोहित, क्र ॉच-कुलंग आदी स्थानिक स्थलांतरित पक्षी, तर पाणकोंबडी, तलवार बदक, तवंग, थापट्या, भुवई, लालसरी, लहान बगळा, जांभळी पाणकोंबडी, मुग्ध बलाक, आयबीस, स्टॉर्क आदी स्थानिक पक्षांबरोबरच या ठिकाणी पक्ष्यांप्रमाणेच उदमांजर, कोल्हे, मुंगूस, लांडगे, रानडुक्कर, मृदू कवच कासवे, विविध प्रकारचे साप तर ऊसक्षेत्र असल्याने बिबट्यांसारख्या वन्यप्राण्यांचा अधिवासही बघायला मिळतो तर जलाशयात २४ विविध जातीचे मासे, ४०० पेक्षा अधिक वनस्पती विविधता आहे. वनविभागामार्फत विविध पक्षिचित्र व छायाचित्रांचे प्रदर्शन, पक्षी निरीक्षणासाठी दुर्भिण, गाइड, दिशादर्शक फलक, विविध स्टॉल उभारण्यात आले आहेत. एकंदरीत वनविभागाने पहिल्याच वर्षी उत्कृष्ट नियोजन केले आहे याद्वारे पक्षी अभ्यासक आणि पक्षिप्रेमींसाठी मेजवानी ठरत आहे.