मराठी अनुवाद कार्यशाळेचे उद््घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:18 AM2019-07-28T00:18:04+5:302019-07-28T00:19:43+5:30

नॅशनल बुक ट्रस्ट, नवी दिल्ली व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे दोन दिवसीय बाल साहित्य मराठी अनुवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र गुर्जर उपस्थित होते.

 Inauguration of Marathi Translation Workshop | मराठी अनुवाद कार्यशाळेचे उद््घाटन

मराठी अनुवाद कार्यशाळेचे उद््घाटन

Next

नाशिक : नॅशनल बुक ट्रस्ट, नवी दिल्ली व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे दोन दिवसीय बाल साहित्य मराठी अनुवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र गुर्जर उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या उद््घाटन प्रसंगी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर भाषा फाउंडेशच्या संस्थापक स्वाती राजे, निवेदिता मदाने-वैशंपायन, विनायक रानडे, डॉ. स्वप्नील तोरणे, वंदना अत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
दिवसभरात झालेल्या या कार्यशाळेत ‘अनुवादाचे विश्व’ या विषयावर रवींद्र गुर्जर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी भावना भालेराव, भाग्यश्री गुजर, किरण काळे, सुवर्णा चव्हाण, गौरी जोशी, डॉ. सुमिधा कसरेकर, अ‍ॅड. दीप्ती नाशिककर, मृदुला शुक्ल, सरिता पटवर्धन, प्रथमा पुंडे, राधिका गोडबोले आदी उपस्थित होते.
लहान मुले आणि कुमार वयोगटातील मुलांना सांस्कृतिक, बौद्धिक आणि वैचारिक वाढ होण्यासाठी दर्जेदार बालसाहित्य निर्माण होणे आवश्यक असून, आंतरभाषीय आदान-प्रदान होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन गुर्जर यांनी केले.

Web Title:  Inauguration of Marathi Translation Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.