Inauguration of gardener's nature exhibition | माळी यांच्या निसर्गचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

माळी यांच्या निसर्गचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

नाशिक : चित्रकार अनिल माळी यांनी रेखाटलेल्या विविध प्रकारच्या निसर्गचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रकांत धामणे आणि दीपक देवरे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. गंगापूर रोडवरील हार्मनी आर्ट गॅलरीत प्रारंभ झालेले हे प्रदर्शन नागरिकांसाठी १२ आॅगस्टपर्यंत खुले ठेवण्यात येणार आहे.
प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर बोलताना धामणे यांनी माळी यांच्या चित्रशैलीचा प्रवास मूर्ततेकडून अमूर्ततेकडे झाला असल्याचे सांगितले. त्या अमूर्त चित्रांमध्येदेखील रंगांचा अप्रतिम ताळमेळ साधला गेल्याने ती अत्यंत मनमोहक दिसतात. नाशिकच्या या चित्रकाराचा प्रवास असाच बहरत राहो, अशा शुभेच्छादेखील धामणे यांनी दिल्या. हे चित्रप्रदर्शन दररोज सायंकाळी ५ ते ९ या वेळेत नागरिकांसाठी खुले असून, नागरिकांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन माळी यांनी केले. याप्रसंगी विवेक गरूड, दिनकर जानमाळी, अनिल अभंगे, केशव कासार, विनोद राठोड आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Inauguration of gardener's nature exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.