शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

दिव्यांग बालनाट्य स्पर्धांचे दिमाखात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 10:24 PM

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या द्वितीय महाराष्ट्र राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धा २०१९-२० चे गुरुवारी (दि.१३) दिमाखात उद्घाटन झाले.

ठळक मुद्देदिव्यांग बालकलाकारांचा कलाविष्कार दि्वतीय दिव्यांग बालनाट्य स्पर्धेस सुरुवात

नाशिक : सामान्य मुलांपेक्षा दिव्यांग मुलांचे जीवन कठीण असले तरी त्यांचे जगणे इतरांनाही स्फूर्ती देणारे असल्याचे ही मुले त्यांच्या कलाकृतीतून दाखवून देत असल्याचे प्रतिपादन शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी केले.  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या द्वितीय महाराष्ट्र राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धा २०१९-२० चे गुरुवारी (दि.१३) दिमाखात उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर प्रा. रवींद्र कदम, श्यामराव लोंढे, राजेश जाधव, दिना वाघ, हेमंत गव्हाणे आदी उपस्थित होते. डॉ. वैशाली झनकर म्हणाल्या, दिव्यांग बालनाट्य स्पर्धेतून अशा मुलांना कलाविश्वात मुक्त संचाराची संधी असून, येणाऱ्या दिवसांमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनाही या स्पर्धांमध्ये सहभागी होता यावे यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. दिव्यांग बालनाट्य स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पाच नाटकांचे सादरीकरण झाले. यात टाकळघाट येथील संत विक्तुबाबा मतिमंद मुला-मुलींच्या निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी हक्कांसाठी लढण्यापेक्षा स्वकर्तव्याशी एकनिष्ठ राहून सामाजिक  जबाबदारीचे भान ठेवून के लेले कर्तव्य निष्फळ ठरत नाही. याची शिकवण देणाºया ‘धोंडफळ’ नाटकाने रसिकांचे लक्ष वेधून घेतले. त्यासोबतच पहिल्या दिवशी प्रबोधिनी विद्यामंदिर नाशिकच्या विद्यार्थ्यांनी मनीषा नलगे लिखित कांचन इप्पर दिग्दर्शित काव काव नाटकाचे सादरीकरण केले. तर पडसाद अपंग व पुनर्वसन केंद्र नाशिक यांच्या पल्लवी पटवर्धन लिखित व दिग्दर्शित होम अरेस्ट, मुंबईच्या रोटरी संस्कारधाम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे डॉ. विजया वाड लिखित व भरत मोरे दिग्दर्शित मंकू माकडे व नाशिकच्या पुनर्वास मतिमंद मुलांच्या शाळेने शुभांगी पोवार लिखित व दिग्दर्शित हरवत चाललंय बालपण हे नाटक सादर करताना दमदार अभिनयातून प्रेक्षक व परीक्षकांनाही प्रभावित केले. विशेष म्हणजे बहुतांश संस्थांनी सामाजिक प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणाºया विषयांवर भर टाकण्याचा प्रयत्न करीत या स्पर्धेतून सामाजिक समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या स्पर्धांचे परीक्षण नयना डोळस, वृषाली घारपुरे, निलांबरी खामकर करणार आहेत. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिकBal Natyaबाल नाट्यartकला