नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयात नव्याने सुरू करण्यात आलेले सायबर पोलीस ठाणे तसेच सायबर गुन्ह्याबाबत तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सोमवारी (दि़१) उद्घाटन करण्यात आले.पोलीस आयुक्तालयात गत १५ आॅगस्टला ‘सायबर कक्ष’ सुरू करण्यात आला होता. या माध्यमातून आतापर्यंत ४० गुन्ह्यांची नोंद झाली असून, ३५ गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश मिळाले आहे़ या गुन्ह्यांमध्ये ३३ संशयितांना अटक करून त्यांच्याकडून ५ लाख १० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. नाशिक पोलिसांनी झारखंड येथील एका आरोपीचा शोध घेण्याच्या कामगिरीची दिल्ली पोलिसांनी दखल घेतली आहे़ सायबर गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित झाल्याने नागरिकांची एक चांगली सोय झाली आहे़
पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्याचे उद्घाटन
By admin | Updated: May 2, 2017 18:09 IST