शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

‘वेस्ट टू एनर्जी’ या पहिल्या पथदर्शक प्रकल्पाचे नाशिकमध्ये उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 5:32 PM

गिरीश महाजन यांची उपस्थिती : पर्यावरणपूरक प्रकल्पांचा चालना देण्याची गरज

ठळक मुद्देनद्या-नाल्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करणे अपरिहार्य महापालिकेला ९९ हजार युनिट वीज दरमहा मोफत मिळणार

नाशिक : नद्या-नाल्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करणे अपरिहार्य ठरणार आहे. ‘वेस्ट टू एनर्जी’सारखे पर्यावरणपूरक प्रकल्प प्रत्येक नगरपालिका व महापालिकांमध्ये राबविण्याची गरज आहे. विविध देशांच्या मदतीने आणि भारत व राज्य सरकारतर्फे अशा पर्यावरणपूरक प्रकल्पांना चालना देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक महापालिका व भारत-जर्मन सरकारच्या मदतीने उभ्या राहिलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना दिली.खतप्रकल्पाजवळ जर्मन सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण सुधार कार्यक्रमांतर्गत जर्मन सरकार व भारत सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून उभ्या राहिलेल्या कच ऱ्यापासून वीज निर्मिती या प्रकल्पाचे उद्घाटन महाजन यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महापौर रंजना भानसी होत्या. यावेळी महाजन यांनी सांगितले, महापालिकेने या प्रकल्पासाठी केवळ जमीन दिली आहे. त्या मोबदल्यात महापालिकेला ९९ हजार युनिट वीज दरमहा मोफत मिळणार आहे. घनकचऱ्याची विल्हेवाट हा प्रश्न सर्वच नगरपालिका व महापालिकांना भेडसावणारा प्रश्न आहे. नाशिक महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला चालना दिल्याने त्याचे अनेक फायदे शहराला होणार आहेत. भविष्यात या प्रकल्पाची क्षमताही वाढविण्याचे प्रयत्न केले जातील. प्रक्रिया न केलेले पाणी नदी-नाल्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या सांडपाण्याचा पुनर्वापर होण्यासाठी अथवा सिंचनासाठीही त्याचा कसा वापर होईल, यासाठी प्रयत्न केले जातील. आपले शहर स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त व्हायचे असेल तर टाकाऊ वस्तूंवर प्रक्रिया करून त्यापासून वेस्ट टू एनर्जीसारखे पर्यावरणपूरक प्रकल्प उभे राहिले पाहिजेत. नागरिकांनीही ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून अशा प्रकल्प वाढीसाठी हातभार लावण्याची गरज असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले. यावेळी महापौर रंजना भानसी यांनीही मनोगत व्यक्त करत प्रकल्पामुळे महापालिकेला ८ लाख रुपयांची वीज मोफत मिळणार असल्याचे सांगितले. शहर सुधार समितीचे सभापती भगवान दोंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. जीआयझेडचे जितेंद्र यादव यांनी प्रकल्पाची माहिती दिली. सूत्रसंचालन गोपीनाथ हिवाळे यांनी केले. व्यासपीठावर जीआयझेडचे डर्क वॉल्टर, आमदार बाळासाहेब सानप, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण, सभागृहनेता दिनकर पाटील, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी यांच्यासह प्रभागाचे नगरसेवक सुदाम डेमसे, पुष्पा आव्हाड, संगीता जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाenvironmentवातावरण