शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या खंडपीठाचे उद्घाटन

By admin | Updated: March 23, 2015 23:59 IST

एकनाथ डवले़ई - कोर्टाने लागतील प्रश्न मार्गीचव्हाण यांचे प्रतिपादन

, नाशिक : व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून वकील व पक्षकारांना आपले म्हणणे मांडण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास त्यातून जागेचा प्रश्न आपोआप सुटून कमी वेळेत गतिशील न्यायदानाचे काम करता येईल. तसेच ई-कोर्टाची अंमलबजावणी केल्यास वकील व पक्षकारांचे सर्वच प्रश्न मार्गी लागतील, असे प्रतिपादन, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्र ार निवारण आयोगाचे अध्यक्ष आर. सी. चव्हाण यांनी केले. राज्य ग्राहक तक्र ार निवारण आयोगाच्या नाशिक परिक्रमा खंडपीठाचे उद्घाटन सोमवारी चव्हाण यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते़यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, परिक्रमा खंडपीठाच्या कामासाठी जागा असो अथवा नसो आहे त्या स्थितीतही चांगले काम करता येणे शक्य आहे़ या कामासाठी ई-कोर्ट तथा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग संकल्पनेचा स्वीकार केल्यास जागा व वाहन पार्किंगचे प्रश्न निर्माण न होता प्रत्येकाला कमी जागेत बसल्या ठिकाणी काम करता येईल व न्यायदानाचे कामही अधिक गतीने होण्यास मदत होईल. ज्या लोकांना ग्राहक तक्र ार निवारण आयोगाची माहिती नाही त्यांनाही याकडे वळविता येईल. या खंडपीठाच्या माध्यमातून निकृष्ट प्रतीचा माल ग्राहकांना पुरविणाऱ्यांना चाप बसविण्याबरोबर यातून उत्कृष्ट दर्जाच्या वस्तू व सेवा ग्राहकांना मिळण्यास मदत होईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम म्हणाले की या खंडपीठाचा केवळ नागरिकांनाच नव्हे, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही लाभ होणार आहे़ ग्राहकाभिमुख जीवनात वस्तू खरेदी करताना अनेक जाचक अटी-शर्ती कशा लागू केल्या जातात असे सांगून या न्यायालयासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले़ प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद कारंजकर यांनी न्यायदान प्रक्रियेत इंटरनेटचे उपयोग व त्याची उपयोगाची माहिती दिली़ प्रास्ताविकात नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड़ नितीन ठाकरे यांनी वकील संघाच्या मागणीची पूर्तता झाल्याचे सांगून वकिलांना भेडसावणाऱ्या समस्यांचा उहापोह केला़व्यासपीठावर आयुक्त एकनाथ डवले, राज्य ग्राहक आयोगाच्या सदस्य श्रीमती उमा बोरा, जिल्हा ग्राहक तक्र ार निवारण मंचचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, मुंबई ग्राहक फोरमचे अध्यक्ष अ‍ॅड. आनंद पटवर्धन, मुंबई गोवा बार कौन्सिलचे सदस्य अ‍ॅड़ जयंत जायभावे, अ‍ॅड़ बिपीन बेंडाळे, अ‍ॅड़ अविनाश भिडे, जिल्हा सरकारी वकील राजेंद्र घुमरे, अ‍ॅड़ नारायण राठी, अ‍ॅड़ हेमंत भंगाळे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड़ जालिंदर ताडगे यांनी केले़ आभार अ‍ॅड़ सत्यजित कचोळे यांनी मानले़ या कार्यक्रमास नाशिक बार आसोसिएशनचे पदाधिकारी अ‍ॅड़ बाळासाहेब आडके, अ‍ॅड़ सुरेश निफाडे, अ‍ॅड़ मंगला शेजवळ, अ‍ॅड़ हेमंत गायकवाड, अ‍ॅड़ संजय गिते, अ‍ॅड़ अपर्णा पाटील, अ‍ॅड़ दीपक पाटोदकर आदिंसह तालुका बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)