शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

जैव-वैदयक कचरा व्यवस्थापन मोहीमेचा नाशिक जिलह्यातुन शुभारंभ, आमदार देवयानी फरांदे यांनी केले उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 15:30 IST

नाशिक : जैव-वैद्यकीय कचरा पर्यावरणास हानिकारक ठरत असताना अशा कचऱ्याचे योग्य नियोजन, व्यवस्थापन व निर्मूलन झाले नाही,तर त्यापासून संसर्गजन्य रोगांचा प्रसारही होण्याची भिती असल्याने सर्व वैद्यकीय सेवा संस्थांनी अशा जैव- वैद्यकीय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन गरजेचे आहे. त्यासाठी जैव वैद्यक कचऱ्याचे दुष्परीणाम लक्षात घेऊन या कचऱ्याची व्यवस्थापन प्रणाली ही व्यक्तीवर नव्हे तर ...

ठळक मुद्देकचऱ्याची व्यवस्थापन प्रणाली व्यक्तीवर नव्हे, प्रक्रियेवर आधारीत असावीनाशिक जिल्ह्यातील पथदर्शी अभियानाचे उद्घाटन जैव वैद्यक कचरा व्यवस्थापनासाठी कचराकुंडयांचे वितरण

नाशिक : जैव-वैद्यकीय कचरा पर्यावरणास हानिकारक ठरत असताना अशा कचऱ्याचे योग्य नियोजन, व्यवस्थापन व निर्मूलन झाले नाही,तर त्यापासून संसर्गजन्य रोगांचा प्रसारही होण्याची भिती असल्याने सर्व वैद्यकीय सेवा संस्थांनी अशा जैव- वैद्यकीय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन गरजेचे आहे. त्यासाठी जैव वैद्यक कचऱ्याचे दुष्परीणाम लक्षात घेऊन या कचऱ्याची व्यवस्थापन प्रणाली ही व्यक्तीवर नव्हे तर प्रक्रियेवर आधारीत असावी, असे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ग्लोबल इनव्हायरमेंट फॅसिलीटी (जीईए) युनायटेड नेशन इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ऑर्गनायङोशन (युनिडो) व केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालय यांच्या संयुक्त ह्यजैव-वैद्यकीय कचऱ्याचे पर्यावरणदृष्ट्या सुगोग्य व्यवस्थापनह्ण प्रकल्पाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातन सुरू केलेल्या पथदर्शी अभियानाचे शहरातील एका तारांकित हॉटेलमध्ये देवयानी फरांदे यांच्या हस्ते शुक्रावारी (दि.8) उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर विएन्ना येथील युनिडोच्या मुख्यालयातील प्रकल्प व्यवस्थापक एर्लिडा गलवेन, केंद्रीय पर्यावरण मंत्रलयाचे संचालक मनोज कुमार गांगेया राज्य पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचीव सतीश गवळी, जीईएप व युनिडोचे प्रादेशिक समन्वयक डॉ. शक्तीप्रसाद धुआ, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना फरांदे यांनी जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन कायदा हा नागरिकांच्या सुरक्षेसाठी असून यातील डॉ. महत्वाचा घटक आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करताना एमपीसीबीच्या अधिका:यांनी डॉक्टरांना त्याचा त्रस होणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचेही सांगितले. तर तसेच रुग्णालयालय व्यवस्थापनात औषधनिर्माण शास्त्रातील विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रधान वैज्ञानिक अधिकारी डॉ. अमर सुपाते व सतीश गवळी यांच्या हस्ते जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन व निर्मूलनासंबधी जनजागृती करणाऱ्या मोबाईल अ‍ॅपचे उद्घाटन माहितीपटाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे यांना जैव वैद्यक कचऱ्यांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक कचराकुंडयांचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरणही करण्यात आल्या.

टॅग्स :pollutionप्रदूषणmedicineऔषधंdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल