अंगणवाडी सेविकांचे बेमुदत धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:48 IST2018-09-19T00:48:16+5:302018-09-19T00:48:51+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेल्या १३६ अंगणवाड्या पूर्ववत सुरू कराव्या या मागणीसाठी हितरक्षक सभेच्या वतीने सेविका आणि मदतनिसांनी मंगळवारपासून (दि. १८) बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

अंगणवाडी सेविकांचे बेमुदत धरणे
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेल्या १३६ अंगणवाड्या पूर्ववत सुरू कराव्या या मागणीसाठी हितरक्षक सभेच्या वतीने सेविका आणि मदतनिसांनी मंगळवारपासून (दि. १८) बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
महापालिकेने चाळीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाड्या बंद केल्या असून, त्यामुळे या सेविका आणि मदतनीस रस्त्यावर आल्या आहेत. महापालिका आयुक्तांनी महासभेच्या ठरावाचा आधार घेतला असला तरी महासभेच्या पूर्वानुमतीशिवाय त्या बंद केल्या आहेत. अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमीत कमी पंधरा व जास्तीत जास्त वीस करण्यात यावा तसेच हा ठराव मंजूर करण्याचा अधिकार महासभेला देण्यात यावा, लोकसंख्येच्या तुलनेत अंगणवाड्यांची संख्या वाढवावी, अंगणवाड्यांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा पुरवाव्या यांसह अन्य मागण्यांसाठी महापालिकेच्या मुख्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.