नाशिक : जुने नाशिक परिसरातील पिंजारघाटरोड भागात राहणाऱ्या एका ४८ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. रुबीना आझाद शेख (रा.बडीदर्गा, पिंजारघाट) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. सोमवारी (दि.३०) अज्ञात कारणातून पाचव्या मजल्यावरील राहत्या सदनिकेत रुबिना हिने छताला असलेल्या पंख्याच्या हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केली. हा प्रकार नातेवाइकांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित महिलेला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू असताना वैद्यकीय सूत्रांनी महिलेला मृत घोषित केले. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जुन्या नाशकात महिलेने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 01:33 IST