शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
5
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
6
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
7
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
8
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
9
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
10
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
11
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
12
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
13
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
14
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
15
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
16
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
17
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 01:49 IST

किरकोळ बाजारात कांदा भावाने किलोमागे शंभरी गाठली असतानाच सोमवारी कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव व येवला येथील बड्या कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर खात्याने अचानक धाडी टाकल्या. या धाडसत्रामुळे लासलगावी शेतमालाचे लिलाव बंद पडले.

नाशिक : किरकोळ बाजारातकांदा भावाने किलोमागे शंभरी गाठली असतानाच सोमवारी कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव व येवला येथील बड्या कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर खात्याने अचानक धाडी टाकल्या. या धाडसत्रामुळे लासलगावी शेतमालाचे लिलाव बंद पडले.
गेल्या काही दिवसांपासून कांदा भावाने उच्चांक गाठला आहे. किरकोळ बाजारात कांदा तब्बल ८० ते १०० रुपये किलोने विक्री होत आहे. त्यामुळे सामान्य ग्राहक मेटाकुटीला आला आहे. त्यातच कांदा साठेबाजीच्या तक्रारी वाढत आहेत.
कांदा व्यापाºयांचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी तसेच साठेबाजीच्या संशयावरून प्राप्तिकर खात्याने लासलगावच्या ४ तर येवल्याच्या एका बड्या कांदा व्यापाºयांवर धाडी टाकल्या. कार्यालये व कांदा साठवणुकीच्या खळ्यांवर पडलेल्या छाप्यांनी व्यापाºयांचे धाबे दणाणले. त्या निषेधार्थ व्यापाºयांनी लिलाव बंदचे अस्त्र उपसले आहे. प्राप्तिकरच्या अधिकाºयांनी कांदा व्यापाºयांचे मागील पाच वर्षापूर्वीच्या व्यवहाराच्या तपशीलाची कागदपत्रे तसेच कांद्याची असलेली साठवणूक तपासली.
केंद्र सरकार हेतुपुरस्सर व्यापाºयांना लक्ष्य करीत आहे, कांदा व्यापाºयांवर अश्या धाडी पडत असतील तर कांदा कसा खरेदी करायचा व तो साठवायचा कसा व कोठे, असा प्रश्न व्यापारी उपस्थित करत आहेत.
साठवणुकीवर नियंत्रणासाठी पथके?
कांद्याचे वाढलेले भाव, अतिवृष्टीने झालेले नुकसान, नवीन कांदा येण्यास होणारा विलंब यामुळे निर्माण होणारी तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. नफेखोरीच्या उद्देशाने निर्बंध असतानाही व्यापाºयांकडून साठा केला जातो आहे की काय, याची पडताळणी करण्यासाठी ही पथके आल्याचे प्रारंभी सांगितले गेले. मात्र ही आयकर खात्याची पथके असल्याचे नंतर स्पष्ट झाले.
देशांतर्गत कांद्याच्या दराला लगाम घालण्यासाठी आता कांदा साठवणुकीवरही नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांकडून कांद्याची आवक, विक्री आणि शिल्लक साठा याबाबतचा दैनंदिन अहवाल मागवून, साठवणुकीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.

टॅग्स :onionकांदाMarketबाजार