नाशिकमधील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी भोंदू अशोक खरात याची आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. आता न्यायालयाने त्याला ८ एप्रिलपर्यंत ७ दिवसांची पोलील कोठडी सुनावली आहे. एसआयटीने त्याला सुरक्षेच्या कारणाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले होते. तत्पूर्वी, एसआयटीने सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयाकडे व्हीसीद्वारे सुनावणीसाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला होता. यानंतर, व्हीसीद्वारेच त्याची सुनावणी पार पडली. त्याला आज पाचव्यांदा न्यायालयासमोर (VC च्या माध्यमाने) हजर करण्यात आले होते. खरेतर, खरातच्या दुसऱ्या एका गुन्ह्यासंदर्भात ही सुनावणी होती. पहिल्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
सुनावणीवेळी कोर्ट रूममध्ये तीन स्क्रीन -सुनावणी दरम्यान, अशोक खरात प्रकरणातील तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी, तसेच सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. सरकारी वकिलांनी खरातची ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. न्यायालयाने ती मंजुर केली. सुनावणीवेळी कोर्ट रूममध्ये तीन स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. एका स्क्रीनमध्ये अशोक खरात होता. दुसऱ्या स्क्रीनमध्ये न्यायाधीश होते. तर तीन स्क्रीनवर प्रेक्षक होते.
अशोक खरात हात जोडून म्हणाला 'नाही' -सुनावणीला सुरूवात झाल्यानंतर, जेवढ्या वेळ सुनावणी सुरू होती तेवढ्याही वेळ खरातची मान खाली असल्याचेच दिसून आले. दरम्यान न्यायाधीशांनी अशोक खरात नाव विचारले. तेव्हा त्याचा आवाज फारच कमी आला. यावर न्यायाधीशांनी त्याला मोठ्याने बोलण्यास सांगितले. यानंतर "भाटे वकील हे आपली बाजू मांडत आहेत, ते आपलेच वकील आहेत का?" असे न्यायालयाने विचारले असता, खरात "हो" म्हणाला. तसेच "आपल्याला काही बोलायचे आहे का? असे न्यायाधीशांनी विचारले असता, यावर अशोक खरातने हात जोडून "नाही", असे उत्तर दिले.
दरम्यान, अशोक खरातच्या या पोलीस कोठडीला त्याच्या वकिलाने विरोध केला. यासंदर्भात युक्तिवाद करताना आरोपीचे वकील म्हणाले, एवढ्या दिवसांच्या पोलीस कोठडीची आवश्यकता का आहे? कारण यापूर्वीही त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. हा आरोपीचा दुसरा गुन्हा आहे.
Web Summary : Ashok Kharat, accused in a Nashik sexual assault case, received seven days of police custody after a video conference hearing. He appeared before the court for the fifth time, connected to a second offense. He said 'no' with folded hands when asked if he wanted to speak.
Web Summary : नाशिक यौन उत्पीड़न मामले के आरोपी अशोक खरात को वीडियो कॉन्फ्रेंसिंग सुनवाई के बाद सात दिन की पुलिस हिरासत मिली। वह पांचवीं बार अदालत में पेश हुए, जो दूसरे अपराध से जुड़ा था। जब उनसे बोलने के लिए कहा गया तो उन्होंने हाथ जोड़कर 'नहीं' कहा।