शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या कार्य सुविधेकरिता महत्त्वपूर्ण ठराव मंजूर

By admin | Updated: January 9, 2017 01:27 IST

द्विवार्षिक अधिवेशन : आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन

 नाशिक : पोस्टमास्तरांची निवास व्यवस्था योग्य नसल्यास ती घरे नाकारून घरभाडे दिले जावे, महिला कर्मचाऱ्यांना (चाइल्ड केअर) च्या रजा नाकारल्या जाऊ नयेत, प्रत्येक मुख्यालयात चौकशी काउंटर स्वतंत्र्य सुरू करावीत, फेकनोटा डिटेक्टर व काउंटिंग यंत्रे सर्व आॅफिसेसमध्ये उपलब्ध करून द्यावीत, त्याचबरोबर एखाद्या कर्मचाऱ्यास जाणीवपूर्वक पुन्हा आदिवासी किंवा ग्रामीण भागात बदली देऊ नये आदि महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले.
आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनच्या नाशिक विभागाचे द्विवार्षिक अधिवेशन हॉटेल पंचवटी येथे संपन्न झाले. यावेळी सदर ठराव एकमताने मंजूर करण्यात येऊन त्याची तातडीने अंमलबजावणी केली जावी यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आहे. प्रमुख अतिथी म्हणून सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, एआयपीइयूचे सर्कल सचिव सुरेंद्र पालव, सर्कल अध्यक्ष जगदीश पवार यांच्या उपस्थितीत अधिवेशन खेळीमेळीत पार पडले.
यावेळी डॉ. कराड यांनी कर्मचारी संघटनांनी यापुढे समाजाचे नेतृत्व करणे आवश्यक असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले, तर नाशिक विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्या, अडी-अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सर्कलस्तरावर प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पालव यांनी दिले. अधिवेशनातील सरकारी बंगला घेणे रद्द करणे, महिला कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविणे आदि विषयांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. एस. सोनवणे यांनी, तर सूत्रसंचालन अभिजित वानखेडे, बाळासाहेब कराड यांनी केले. त्यानंतर युनियनची पुढील दोन वर्षांकरिता नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी शैलेश कुलकर्णी, सेक्रेटरीपदी डी. एस. सोनवणे, खजिनदारपदी के. एन. चौधरी आदिंची निवड करण्यात आली.
अधिवेशन यशस्वीतेसाठी डी. के. लिलके, अमोल गवांदे, पराग एकांडे, किरण वर्पे, एच. के. बारी आदिंसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)ै