निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोटीत महत्त्वाची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:26 IST2019-02-12T00:18:47+5:302019-02-12T00:26:14+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या दृष्टीने घोटी पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोटीत महत्त्वाची बैठक
घोटी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या दृष्टीने घोटी पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या उपस्थितीत पोलीसपाटील, दक्षता समिती, पोलीस मित्र हजर होते.
बैठकीत शांततामय वातावरणात निवडणुका पार पाडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मागील निवडणुकीतील संवेदनशील गावे, जुन्या गुन्ह्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येऊन गोपनीयतेबाबत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या.
पोलीसपाटलांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात येऊन मागील घटनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी हवालदार राजेंद्र कांगणे, धर्मराज पारधी, भास्कर महाले, शीतल गायकवाड, रविराज जगताप, गणेश सोनवणे यांसह विविध समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.