भारतीय संस्कृतीत गुरूकुल परंपरेला महत्त्व : बंडातात्या कराडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 01:19 AM2019-12-17T01:19:01+5:302019-12-17T01:19:23+5:30

संतांचा आदर्श जीवनात जोपासण्याची गरज आहे. तसेच भारतीय संस्कृतीत गुरुकुल परंपरेला महत्त्व आहे, असा उपदेश बंडातात्या महाराज कराडकर यांनी कीर्तनातून केला.

 Importance of Gurukul tradition in Indian culture: Revolt Karadkar | भारतीय संस्कृतीत गुरूकुल परंपरेला महत्त्व : बंडातात्या कराडकर

भारतीय संस्कृतीत गुरूकुल परंपरेला महत्त्व : बंडातात्या कराडकर

Next

देवळाली कॅम्प : संतांचा आदर्श जीवनात जोपासण्याची गरज आहे. तसेच भारतीय संस्कृतीत गुरुकुल परंपरेला महत्त्व आहे, असा उपदेश बंडातात्या महाराज कराडकर यांनी कीर्तनातून केला.
श्री क्षेत्र लहवित येथील वाडीचा मळा येथे वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू व आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक सद्गुरू जोग महाराज यांच्या शंभराव्या पुण्यस्मरणानिमित्त शताब्दी महोत्सव अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ कराडकर यांच्या कीर्तनाने झाला. यावेळी बंडातात्या महाराज कराडकर म्हणाले की, मस्तक हे संतांच्या चरणी झुकले पाहिजे, ज्यामुळे भारतीय संस्कारातील गुरु कुल पद्धती जोपासली जाते. हीच पद्धती संस्कृतीचा प्राण आहे. त्यामुळे भारतात संस्कृती टिकून समृद्धी नांदत असते. संस्कार जोपासण्यासाठी आज आदर्शांची गरज आहे आणि आदर्श हे जोपासण्यासाठी संतांची गरज असल्याचा उपदेश त्यांनी यावेळी उपस्थित भाविकांना केला.
तसेच नवीन पिढीने आपल्या संस्कृतीची जोपासना करण्यासाठी प्रयत्न करावेत, तरच संस्कृती टिकेल असेही बंडातात्या महाराज कराडकर यांनी सांगितले.
याप्रसंगी गुरुवर्य शिवराम महाराज म्हसकर, महंत द्वाराचार्य लहवितकर महाराज, त्र्यंबकराव गायकवाड, वासुदेव गायकवाड, दीपक देशमुख, दत्तू सहाणे आदींसह वारकरी सांप्रदायातील मान्यवरांसह भगूर, देवळाली कॅम्प, लहवित पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार सोहळा
उद्योजक जी. के. जाधव यांच्यासह उपस्थित संतवृंदाच्या हस्ते कलशस्थापना व वीणापूजन करण्यात आले. सकाळी सुदाम महाराज घाडगे यांचे कीर्तन तर सांयकाळी गणेश महाराज करंजकर यांचे प्रवचन झाले. कराडकर यांना कीर्तनप्रसंगी गायन साथ तुकाराम आरोटे, बनाजी वाकचौरे, योगेश धात्रक, ज्ञानेश्वर तुपे यांनी तर मृदूंगावर विकास बेलूकर, भूषण जाधव यांनी साथ दिली. यावेळी उपस्थित संतवृंदाचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title:  Importance of Gurukul tradition in Indian culture: Revolt Karadkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.