भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 07:39 IST2025-05-18T07:38:04+5:302025-05-18T07:39:23+5:30
आरोपीने तो आयकर अधिकारी असल्याचे सांगून १ कोटी ६० लाख रुपयांची मागणी केली...

भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
नाशिक : माजी मंत्री छगन भुजबळ वापरत असलेल्या मोबाइलवर संपर्क साधून ‘मी इन्कम टॅक्स अधिकारी आहे, तुमच्या साहेबांच्या त्र्यंबकेश्वर फार्महाउसवर आयकर रेड पडणार आहे, त्या टीममध्ये मी आहे. तुम्हाला मदत हवी असल्यास एक काेटी रुपये द्यावे लागतील’ असे सांगून खंडणी मागणाऱ्याला प्रत्यक्ष रक्कम स्वीकारताना नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
राहुल दिलीप भुसारे (२७, रा. करंजाळी) असे संशयिताचे नाव आहे. आरोपीने प्रथम २३ एप्रिलला संपर्क साधला होता. फोन भुजबळ यांचे स्वीय सहायक संतोष गायकवाड यांच्या क्रमांकावर डायव्हर्ट केलेला असल्याने त्यांनी कॉल घेतला. आरोपीने तो आयकर अधिकारी असल्याचे सांगून १ कोटी ६० लाख रुपयांची मागणी केली.
आरोपी पदवीधर, झटपट पैसे कमावणे आले अंगलट
राहुल हा पदवीधर असून, त्याचे यापूर्वी कुठलेही गुन्हेगारी रेकॉर्ड नसून केवळ झटपट पैसे कमविण्याच्या उद्देशाने त्याने हा प्रकार केल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी सांगितले.