किती सांगू मी सांगू कुणाला; आज आनंदी आनंद झाला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:36 IST2020-08-12T00:36:03+5:302020-08-12T00:36:45+5:30
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव यंदा कोविड-१९मुळे जागोजागी छोटेखानी साजरा करण्यात आला असून, शहरातील भाविकांना श्रीकृष्ण जन्मसोहळ्याचा आनंद घेता यावा यासाठी विविध मंदिर व्यवस्थापनांकडून दिवसभरातील भजन कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करत भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव साजरा केला.

मुरलीधर मंदिरात रंगला श्रीकृष्ण जन्माचा सोहळा.
नाशिक : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव यंदा कोविड-१९मुळे जागोजागी छोटेखानी साजरा करण्यात आला असून, शहरातील भाविकांना श्रीकृष्ण जन्मसोहळ्याचा आनंद घेता यावा यासाठी विविध मंदिर व्यवस्थापनांकडून दिवसभरातील भजन कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करत भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव साजरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या टाळेबंदीच्या नियमांतून अद्याप भाविकांसाठी मंदिरे खुली करण्यास शिथिलता मिळाली नाही, त्यामुळे शहरातील विविध कृष्ण मंदिरांसह घरोघरी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा अत्यल्प भाविकांच्या उपस्थित साजरा करण्यात आला.
नाशिकमधील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) यांच्या वतीने वर्षातील सर्वाधिक मोठा महोत्सव श्रीकृष्ण जन्माष्टमीचा असतो. या सोहळ्यास मंगळवारी (दि.११) सायंकाळी ६ ते ८ यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे सुरुवात झाली असून, बुधवारी (दि. १२) पहाटे ५ वाजता मंगल आरती, ८ वाजता शिक्षाष्टकं प्रभू यांचे भागवत प्रवचन, सायंकाळी ७ ते ८ यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ८ वाजेनंतर राधानाथ स्वामी महाराजांचे प्रवचन, अभिषेक, कीर्तन व महाआरती सोहळा होणार आहे. सदरचे कार्यक्रम आॅनलाइन होणार आहेत.