इगतपुरीला रेलरोको,सिन्नरला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 15:51 IST2019-01-08T15:50:55+5:302019-01-08T15:51:19+5:30

देशव्यापी संप : विविध मागण्यांचे निवेदन

Igatpuri RailRoko, Sinnarala Morcha | इगतपुरीला रेलरोको,सिन्नरला मोर्चा

इगतपुरीला रेलरोको,सिन्नरला मोर्चा

ठळक मुद्देसीआयटीयुच्यावतीने इगतपुरी रेल्वे स्थानकावर मुंबई-लखनौ पुष्पक एक्सप्रेस अडविण्यात आली.

नाशिक : कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सीआयटीयुच्यावतीने इगतपुरी रेल्वे स्थानकावर मुंबई-लखनौ पुष्पक एक्सप्रेस अडविण्यात आली. यावेळी कामगारांनी जोरदार घोषणा करत रेलरोको आंदोलन केले. त्याचबरोबर सिन्नर येथेही सीआयटीयुच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.
इगतपुरी येथे सीआयटीयुचे जिल्हानेते देविदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली रेलरोको आंदोलन करण्यात येऊन कामगारांच्या मागणीचे निवेदन स्टेशन मास्टर प्रेमचंद आर्या यांना देण्यात आले. यावेळी इगतपुरी रेल्वे स्थानकाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. स्टेशन मास्तर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, तालुक्यातील गोंदे येथील मोनीयार रु फिंग कंपनी व वाडीवºहे येथील कंपनीतील कमी केलेल्या कामगारांना मागील भरपाईसह कामावर घेण्यात यावे, ज्योती ट्रक्चर कंपनीतील पाच महिने थकलेला पगार देऊन बंद पडलेली कंपनी त्वरीत सुरू करावी तसेच सर्व कामगारांना कामावर घेण्यात यावे, शेतकर्याच्या शेतीमालाला हमी भाव देऊन संपूर्ण कर्जमाफी मिळावी, वनाधिकार कायद्याची काटेकोरपणे अमंलबजावणी करून अपात्र केलेले दावे पात्र करून जमीन कसणाऱ्यांच्या नावे प्लॉट करण्यात यावे, रेल्वे विमा व संरक्षण या सारख्या महत्वाच्या क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुक परवानगी देणे बंद करावी आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत. सीआयटीयुच्यावतीने सिन्नर येथेही तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन निवेदन देण्यात आले.

Web Title: Igatpuri RailRoko, Sinnarala Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.