Idol worship on the birth anniversary of Lokmanya Tilak | लोकमान्य टिळक यांच्या जयंतीदिनी प्रतिमापूजन
लोकमान्य टिळक यांच्या जयंतीदिनी प्रतिमापूजन

नाशिक : थोर समाजसुधारक लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्ताने शहर परिसरात विविध ठिकाणी टिळक यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. शाळांमध्ये टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले तर बालगोपाळ टिळक यांची वेशभूषा करून शाळेमध्ये आले होते. अनेक मुलांनी टिळकांच्या जीवनावर भाषणे केली.
शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सामाजिक उपक्रम तसेच सेवाभावी संस्थांमध्ये लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शहरातील शाळा तसेच खासगी क्लासेस येथेदेखील लोकमान्य टिळक यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शासकीय कार्यालयांत प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच कार्यालयीन आवारात वृक्षरोपण करण्यात आले.
मराठा हायस्कूल
 मराठा हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक जयंती कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरु ण पवार होते. टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात पवार यांनी लोकमान्य टिळकांच्या कार्याचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन सुनील बस्ते यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुहास खर्डे यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी उपमुख्याध्यापक तथा संस्थेचे सेवक संचालक गुलाबराव भामरे, पर्यवेक्षक सुरेश सोमवंशी, पुरु षोत्तम थोरात, रघुनाथ आहेर, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
नाशिक महानगर महामंडळ
 महानगर गणेशोत्सव महामंडळ यांच्या वतीने गणेश उत्सावाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांच्या हस्ते टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. तसेच यावेळी गणेश उत्सावाची आखणी करण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक गजानन शेलार, रामसिंग बाबरी, बबलू परदेशी, लक्ष्मण धोत्रे, प्रसन्न तांबट, शंकर बर्वे, संतोष वाघ, विजय परदेशी, कुणाल मगर आदी उपस्थित होते.
उंटवाडी माध्यमिक विद्यालय
उंटवाडी माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक ज्योती कुलकर्णी यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सुनंदा कुलकर्णी यांनी टिळकांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली. उपमुख्याध्यापक सुनंदा जगताप, कुंदा जोशी, कैलास पाटील, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title:  Idol worship on the birth anniversary of Lokmanya Tilak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.