इगतपुरीतही पावसाने घेतली विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 01:36 IST2019-07-17T01:35:00+5:302019-07-17T01:36:00+5:30

जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली असतानाच सोमवारपर्यंत इगतपुरीत धो-धो कोेसळणाऱ्या पावसाने मंगळवारी विश्रांती घेतली.

 Iagatapurna rain took place during the rain | इगतपुरीतही पावसाने घेतली विश्रांती

इगतपुरीतही पावसाने घेतली विश्रांती

नाशिक : जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली असतानाच सोमवारपर्यंत इगतपुरीत धो-धो कोेसळणाऱ्या पावसाने मंगळवारी विश्रांती घेतली. गेल्या चोवीस तासास इगतपुरीत केवळ ३ मि.मी. गेल्या आठवड्यात इतकाच पाऊस झाला.५० ते ६० मि.मी. पाऊस नोंदविल्या गेलेल्या इगतपुरी तालुक्यात जुलै महिन्यातील सर्वांत कमी ३ मि.मी. पाऊस
झाला.
यापूर्वी ९ मि.मी. इतकाच निच्चांकी पाऊस या हंगामात झाला होता. संपूर्ण जिल्ह्याकडे पावसाने पाठफिरविली असून, शेतीची कामे खोळंबली आहेत. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि पेठ तालुक्यातील पावसाने काहीअंशी दिलासा दिलेला असताना तीन ते चार दिवसांपासून या तालुक्यांमधील पाऊसही रुसून बसला आहे. मंळवारी इगतपुरी, पेठ, वगळता जिल्ह्यात कुठेही पाऊस होऊ शकला नाही.

Web Title:  Iagatapurna rain took place during the rain