I will serve the country sincerely ...! | मैं पुरे इमानदारी से देश की सेवा करूंगा...!
मैं पुरे इमानदारी से देश की सेवा करूंगा...!

ठळक मुद्दे४२ आठवड्यांचे खडतर व कठोर असे प्रशिक्षणतुमची जात केवळ सैनिक आणि धर्म केवळ देशसेवा ‘सर्वत्र इज्जत वो इक्बाल’ हे ब्रीद वेळोवेळी सिध्द करा

नाशिक : ‘मैं दृढ प्रतिज्ञा करता हूं की, कानून द्वारा निश्चित किये गये भारतीय संविधान का सच्चे मन से वफादार रहुंगा और मैं अपने कर्तव्य के अनुसार ईमानदारी और सच्चे मन से देशसेवा करुंगा...’ अशी शपथ मोठ्या आत्मविश्वासाने घेत भारतीय तोफखान्याच्या ३०४ जवानांनी (गनर) सशस्त्र संचलन करत डोळ्यांची पारणे फेडली.
निमित्त होते, नाशिकरोड येथील भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या शपथविधी सोहळ्याचे. गुरूवारी (दि.१२) केंद्राच्या संचलन मैदानावर उगवत्या दिनकराच्या साक्षीने दिमाखदार शपथविधी सोहळा पार पडला. ४२ आठवड्यांचे खडतर व कठोर असे प्रशिक्षण घेत स्वत:ला ‘तोपची’ म्हणून सिद्ध करणाऱ्या नवसैनिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन करत उपस्थित मुख्य अतिथी विशिष्ट सेवा पदक विजेते स्कूल आॅफ आर्टीलरीचे मेजर जनरल विनय धीमण उपस्थित होते. त्यांना तोफखान्याचे कमान्डंट ब्रिगेडियर जे. एस. गोराया यांनी उमराव कवायत मैदानाच्या सलामीमंचावर लष्करी थाटात आणले. यानंतर धीमण यांनी शपथविधी सोहळ्याचे समीक्षण करत मैदानाची जीप्सीमधून पाहणी केली.
केंद्राच्या कवायत मैदानावर झालेल्या या सोहळ्याप्रसंगी धीमण म्हणाले, आपल्या पूर्ण कारकिर्दीत आजचा दिवस सदैव स्मरणात ठेवा. तोफखाना केंद्राचे शास्त्रशुद्ध सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुमची जात केवळ सैनिक आणि धर्म केवळ देशसेवा असायला हवा. सकारात्मक आणि धर्मनिरपेक्ष विचाराने तुम्ही ‘तोपची’ म्हणून भारतीय सेनेत अभिमानास्पद कामगिरी करावी आणि आपल्या तोफखाना केंद्राचा नावलौकिक वाढवावा. मला विश्वास आहे, भविष्यात या तुकडीचे सर्व सैनिक आपली जबाबदारी चोखपणे बजावून केंद्राचे नाव उज्ज्वल करतील. आपला सैनिक धर्म व सैनिकी शिस्त कधीही विसरता कामा नये, असा गुरूमंत्रही त्यांनी यावेळी नवसैनिकांना दिला. तोफखान्याला ‘गॉड आफ वॉर’ असे म्हटले जाते, यावरून आपल्या दलाचे गांभीर्य सहज लक्षात येते. ‘सर्वत्र इज्जत वो इक्बाल’ हे ब्रीद वेळोवेळी सिध्द करण्याचा पुरेपुर प्रयत्न करावा, असे आवाहनही धीमण यांनी यावेळी केले.

हे गनर ठरले उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी
परेड कमांडर संजीत काद्यान (अष्टपैलू कामगिरी), गनर मुक्तयार सिंह (शस्त्र हाताळणी), विष्णू वी (सुदृढ शारिरिक क्षमता), दीपक यादव (तंत्रज्ञ), हर्षदीप कुमार (रेडियो आॅपरेटर), लखविन्दर सिंह (उत्कृष्ट गनर), मदन कुमार (वाहनचालक), सेफमेस वदिया रामाकृष्णा यांना मेजर जनरल विनय धीमण, तोफखान्याचे कमान्डंट ब्रिगेडियर जे. एस. गोराया यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, पदक देऊन गौरव करण्यात आला.
 

Web Title: I will serve the country sincerely ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.