The huts on Dindori Road were burnt down | दिंडोरीरोडवर झोपड्या जळाल्या

दिंडोरीरोडवर झोपड्या जळाल्या

पंचवटी : दिंडोरीरोडवरील पाटकिनारी असलेल्या झोपड्यांना रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमाराला आग लागल्याची घटना घडली. यात चार झोपड्या जळाल्या आहे. सुदैवाने घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.
दिंडोरीरोडला पाटकिनारी झोपड्या असून, रविवारी दुपारच्या सुमाराला अचानक एका झोपडीतून धूर निघू लागला त्यानंतर काही वेळात शेजारी असलेल्या अन्य झोपड्यांनी पेट घेतला.
परिसरात शेकडो झोपड्या असल्याने भीषण आग लागण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती कळविली त्यानंतर लगेच पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून चार झोपड्यांना लागलेली आग आटोक्यात आणली.
२या घटनेत रवि जाधव, पप्पू इस्माईल, गफूर सय्यद, शब्बीर सय्यद यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या सदर आगीचे कारण गुलदस्त्यात आहे. पंचवटी अग्निशमन दलाचे जवान लिडिंग फायरमेन संजय कानडे, वाहनचालक बाळू पवार, नितीन म्हस्के, संजय माळी, किसन भालेराव आदींनी आग विझविली.

Web Title: The huts on Dindori Road were burnt down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.