पत्नीच्या खुनानंतर फरार पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:53 IST2019-01-13T00:52:15+5:302019-01-13T00:53:19+5:30
प्रेमसंबंधातून केलेल्या विवाहानंतर नांदण्यास येत नाही म्हणून पायल संजय परदेशी ऊर्फ पायल दामोदर हिचा गळा आवळून पती जयेश दामोदर याने खून केल्याची घटना मंगळवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास कॉलेजरोडवरील सत्यम लीला टॉवरच्या गच्चीवर घडली होती़

पत्नीच्या खुनानंतर फरार पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
नाशिक : प्रेमसंबंधातून केलेल्या विवाहानंतर नांदण्यास येत नाही म्हणून पायल संजय परदेशी ऊर्फ पायल दामोदर हिचा गळा आवळून पती जयेश दामोदर याने खून केल्याची घटना मंगळवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास कॉलेजरोडवरील सत्यम लीला टॉवरच्या गच्चीवर घडली होती़ या घटनेनंतर फरार झालेला तिचा पती जयेश दामोधर यास शुक्रवारी (दि़११) दुपारी पोलिसांनी अटक केली. त्याने दारूमध्ये उंदीर मारण्याचे औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़